(फलटण/ प्रतिनिधी): – फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हद्दही खूप मोठी आहे. त्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या तलाव वन विभागाची जमीन डोंगर तसेच विस्तीर्ण शेती आहे त्या ठिकाणी तसेच काही ठिकाणी मनुष्यांचा वावर कमी असतो अशा ठिकाणी लोकांना अडवून वाहने अडवून लुटमार करणाऱ्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.
दिनांक ०७ डिसेंबर रोजी दोन महाविद्यालयीन तरुण-तरुणी सकाळी मुलाचा वाढदिवस असल्याने कुरवली येथील तलावाजवळ बारा वाजण्याच्या दरम्यान गेलेले होते वाढदिवस असल्याने त्यांच्या अंगावर सोन्याच्या चैनी व दोन स्मार्टफोन होते.त्या ठिकाणी इतर कोणीही नसल्याचा फायदा घेऊन दोन अज्ञात इसमांनी त्यांना दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन चैन व दोन्ही स्मार्टफोन असे जवळजवळ तीन लाख रुपयाचा ऐवज काढून घेतला.
त्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्याच दिवशी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद होता सदर घटना गंभीर असल्याने या ठिकाणी पोलिसांशी गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली व पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी कार्तिक महेश चव्हाण (वय २५ वर्ष राहणार कुरवली खुर्द)यास अटक केली. असून त्याच्याकडून मुलीकडील चोरीस गेलेला स्मार्टफोन किंमत अंदाजे २५ हजार रुपये जप्त करण्यात आलेला असून त्याचा साथीदार स्वप्निल महेश जाधव (रा.कुरवली,ता.फलटण, सातारा)हा अद्यापही फरारी आहे.
सदर आरोपी यांचा अभिलेख तपासला असता त्यांच्यावर यापूर्वीसुद्धा या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींवर संघटित गुन्हेगारी कलमांची सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक पवार पो. हवा. कदम चतुरे पो. ना. जगदाळे , दडस यांनी सदरची कारवाई केली आहे.
अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.