गोखळी (प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील प्रसिद्ध गझलकार , शाहीर,कवी, प्रमोद सुनील जगताप यांना ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ नवी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनातील ” कवी कट्टा” यामध्ये कवी प्रमोद जगताप (फलटणकर) यांना गझल सादर करण्याची संधी मिळणार आहे. यानिमित्ताने दिल्लीत घुमणार कवी प्रमोद जगताप यांची गझल ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ तालकटोरा स्टेडिअम नवी दिल्ली येथे दि.२१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. या साहित्य संमेलनात लक्षवेधी ठरणारा कवीकट्टा यामध्ये कवी प्रमोद जगताप (फलटणकर) यांना गझल सादर करण्याची संधी मिळणार आहे.
कवी प्रमोद सुनिल जगताप गोखळी ता.फलटण जि.सातारा येथील ग्रामीण भागातील कवी असून सध्या केंद्रीय अनु.जाती निवासी आश्रमशाळा पळशी ता.माण येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित असणारे कवी प्रमोद जगताप हे सध्या कवितेचं गावं जकातवाडी – फलटण तालुकाध्यक्ष आणि काव्यफुले मराठी साहित्य व कला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सचिव पद भूषवून साहित्य सेवा करित आहेत गोखळी येथे कवी प्रमोद जगताप यांच्या माध्यमातून नुकतेच ग्रामीण कवी संमेलन झाले . त्यांच्या दिल्ली साहित्यवारीसाठी विविधस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.