(जावली/ अजिंक्य आढाव) सन 2024 मधे 12व्या नॅशनल चॅम्पियन कराटे स्पर्धेत राॅयल इंग्लिश स्कूल जावली या शाळेतील 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत शाळेच नावलौकिक केले आहे.ही स्पर्धा कर्नाटक या राज्यात पार पडली.या स्पर्धेत एकूण 800 विद्यार्थी सहभागी झाले होते.यंदा पुन्हा विजेते ठरत यशाची अखंड परंपरा कायम ठेवली आहे.
साहिल सचिन गावडे – गोल्ड मेडल
श्रेयस अमोल दडस – गोल्ड मेडल
अक्षदा राहुल गावडे- गोल्ड मेडल
सिद्धी प्रकाश चवरे -गोल्ड मेडल
श्रावण यशवंत नलवडे-गोल्ड मेडल
नवनाथ बाबुराव पोकळे- सिल्वर मेडल
ओम दत्तात्रय गावडे -सिल्वर मेडल
विराज गणेश गावडे -सिल्वर मेडल
इंद्रजीत किशोरकुमार सांगळे -सिल्वर मेडल
2 फेब्रुवारी 2025 रोजी गोवा या ठिकाणी स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांंची निवड झाली असून सदर स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. अमोल चवरे, संचालिका सौ.कांचन चवरे , विद्यालयाचे प्राचार्य समीर गावडे व क्रीडा शिक्षक महादेव वाघमोडे व सर्व शिक्षक स्टाफ सह विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.