(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण पासून पूर्व कडील भागात शिखर शिंगणापूर ३६ किलो मीटर अंतरावर असून श्री क्षेत्र असल्याने महाराष्ट्रातुन या मंदिरात शंभु महादेव यांच्या दर्शनासाठी येतात मात्र इथं पोहचण्यासाठी रस्ते सुरक्षित नसल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे.शिखर शिंगणापूर च्या पायथ्याला श्री.क्षेत्र जावल सिद्धनाथ (जावली) या ठिकाणी असुन पौर्णिमा, अमावस्या दिवशी गर्दी होती . सध्या दळणवळण व्यवस्था भरपूर मोठ्या प्रमाणात वाढली असून रस्ते विकास झाला नसल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होते.
नाईक बोमवडी ते मिरढे साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन प्रशासन व लोकप्रतिनिधीना कधी जाग येणार.?
फलटण हे तालुक्याचे ठिकाण असून शिंगणापूर , आदंरूड, जावली,मिरढे, नाईक बोमवाडी, वडले ,सोनवडी , कोळकी अशी गावे लागतात या गावांमधून शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थी शिक्षक,दुध डेअरीसाठी दुध गाड्या, नोकरदार वर्ग, शेतकरी वर्ग वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून रस्ता दुरुस्ती बाबत निर्णय घ्यावा नागरिकांमधून मागणी केली जात आहे.