(जावली/ अजिंक्य आढाव)- यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणारे ट्रॅक, ट्रॅक्टर ट्रेलर बैलगाड्यांना अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर बोर्ड व रिफ्लेक्टीव्ह टेप लावणे, बंधनकारक केले आहे.तरीही साखर कारखानदार अनेक ऊस वाहतूकदार वाहनं मालक नियम पाळताना दिसत नाहीत.
फलटण तालुक्यात ऊस गाळप नोव्हेंबर पासून सुरू झाली.ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पुढे व मागे रिफ्लेक्टर टेप न लावणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊसाची वाहतूक करणे मागील वाहने पाहण्यासाठी आरसे न लावणे , मोठ्या आवाजामध्ये म्युझिक सिस्टम लावणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वाहने रस्त्याच्या कडेला उभी करणे , सिंगल ट्रेलर रस्त्यात उभा करणे, शेतातून ट्रॅक्टर बाहेर काढताना इतर वाहनांचा अंदाज न घेणे अशा चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले वाहतुकीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी लवकरच बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
कडक कारवाईची गरज
फलटण तालुक्यातील सध्या कारखाने सुरू असून पुणे – पंढरपूर रोड वरील ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
ट्रॉली मागे रिफ्लेक्टर कापड बसवण्याबाबत
पुणे पंढरपूर रोडवर तसेच साखरवाडी,उपळवे व ग्रामीण भागातील उसाचे ट्रॅक्टर वाहतूक करत असतात अशा वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप आणि रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होत असून अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.