(फलटण/प्रतिनिधी)- फलटण तालुक्यातील जिंंती गावच्या हद्दीत दुचाकी अंगावर पडल्याने प्रवीण प्रमोद भापकर वय 35 वर्षे राहणार लाटे ता.बारामती जि.पुणे या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या बाबतीत सविस्तर माहिती अशी की मौजे जिंती तालुका फलटण गावच्या हद्दीत जिंती ते फलटण जाणाऱ्या रोडवर प्रवीण प्रमोद भापकर वय 35 वर्ष राहणार लाटे तालुका बारामती जिल्हा पुणे हा त्याची मोटरसायकल क्रमांक यांनी 42 ए बी 2791 चा अपघात झाला असून अपघातात मोटार सायकल त्याचे अंगावर पडून तो बेशुद्ध पडलेला आहे. असे फलटण ग्रामीण पोलिसांनी फोनद्वारे कळवून त्यास पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारास आणले असता डॉक्टरांनी तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले आहे .
या बाबतीत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिकत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.व पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.