(जावली /अजिंक्य आढाव)गेल्या काही दिवसांपासून फलटण ग्रामीण भागातील डिपी चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ने ट्रांसफार्मर चोरी चे अनुषंगाने फलटण शहरातील डीपी चोरी रेकॉर्ड वरील संतोष जगन्नाथ घाडगे , किरण भीमराव घाडगे , सागर युवराज घाडगे ,प्रशांत सुनील जुवेकर सर्व राहणार मलटण या. फलटण , रोहिदास सोपान कदम राहणार चौधरवाडी ता. फलटण यांना अटक केली आहे.
फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत रात्री संशयित रित्या मिळून आले त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर त्यांनी काही डीपी चोरी कबुली दिली आहे. त्यांचेकडूने गैस सिलेंडर व कोपर पण जप्त केले आहे त्यांची सात दिवस पोलिस कोठडी घेतली आहे त्यांचेकडून आणखीन गुन्हे उघड होणेची शक्यता आहे.
अजून सुद्धा डीपी चोरणारे गुन्हेगार टोळी आहेत त्याची माहिती काढणे सुरू आहे तांबे खरेदी करणरे आणि चोरी करणाराचे नाव द्यावे आपले नाव गोपनीय ठेवले जाईल.
सदर कारवाई मा पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शना खाली पो निरीक्षक सुनील महाडीक, शिवाजी जायपत्रे, सपोनि, गुन्हे प्रकटीकरण चे पो.उप.नी गोपाल बदने, महादेव पिसे, नितीन चतुरे,तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी केली.
ग्रामस्थांनी कनेक्शन डीपी वर आहेत त्यांनी सुधा जागृत राहून अचानक लाइट गेलेस ११२ ला कळवावे तसेच डीपी तत्काळ चेक करावे व रात्री नविन मोटरसाइकल चार चाकी दिसलेस तत्काळ ११२ कळवावे तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करावा.
अनेक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावी होत नाही काही गावाची यंत्रणा बंद आहे तरी ग्रामस्थांनी सहकार्य करावे ही विनंती अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आवाहन केले आहे.