हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानराजकीय

निंभोरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास तीन कोटीचा निधी देणार : आमदार सचिन पाटील

(जावली/अजिंक्य आढाव): आज ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. ६ डिसेंबर १९५६ ला दादर येथील चौपाटीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिव देहाचे लाखो अनुयायांच्या साश्रू नयनांच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात त्याच भूमीला चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते.

याच ठिकाणी देशभरातून लाखो भीम आणि आपल्या उद्धारकर्त्याला म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात. याच ठिकाणाहून संपूर्ण देशभरातून आलेल्या काही तत्कालीन अनुयायांनी डॉ.बाबासाहेबांच्या अस्थी आपल्या मूळ गावी घेऊन जाऊन त्यांचे जतन केले आहे. महाराष्ट्र देशाच्या अनेक भागांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी या दर्शनासाठी ठेवल्या आहेत. फलटण तालुक्यातील निंभोरे या गावी अशाच पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे जतन ठेवण्यात आले आहे. दरवर्षी 14 एप्रिल, 6 डिसेंबर या दिवशी फलटणसह तालुक्यातील अनेक गावांमधून भीमा अनुयायी, भीमसैनिक निंभोरे या गावी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जातात. निंभोरे येथील या वास्तूला प्रती चैत्यभूमी या नावाने ओळखले जाते.
यावर्षी नवनिर्वाचित फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन कांबळे पाटील यांनी फलटण शहर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून निंभोरे या ठिकाणी जाऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे दर्शन घेतले. यावेळी लोकांच्या मागणीचा विचार करून त्यांनी निंभोरे या गावी चैत्यभूमीच्या धर्तीवर नियोजित प्रति चैत्यभूमीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी नवीन स्मरकासाठी आमदार फंडातून देण्याची घोषणा केली.त्यांच्या या घोषणेमुळे निंभोरेसह संपूर्ण तालुक्यातील भीम सैनिकांच्या वतीने त्याचे आभार मानण्यात आले.

यावेळी आमदार सचिन कांबळे पाटील, नगरसेवक सचिन अहिवळे ,सामाजिक कार्यकर्ता सुधीर अहिवळे,कामगार संघटना अध्यक्ष सनी काकडे,निंभोरे ग्रामपंचायत सदस्य अमित रणवरे,धीरज कांबळे,भाजपा अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष राजेंद्र काकडे, सनी मोरे, विकी बोके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!