(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण पासून पूर्व भागातील जावली, शिखर शिंगणापूर या ठिकाणावर असणाऱी मंदिर हि कुलदैवत म्हणून ओळखली जातात मात्र या ठिकाणी अद्यापही विकास झाला नसल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ही धार्मिक स्थळे असुन सुद्धा महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र फलटण कडून येणाऱ्या शिखर शिंगणापूर रोडची अस्वस्थ दयनीय झाली असून वाहनं चालकांना मोठी कसरत करावी लागते.
फलटण पासून सोनवडी ,वडले ,नाईकबोंमवाडी मिरढे,जावली ,कोथळे ,शिखर शिंगणापूर असा जवळ पास 36 किमी अंतर असुन गेल्या पंचवार्षिक मधे रस्त्यात दुरुस्ती केली नसुन नागरिकांन मधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबरोबरच ग्रामीण भागातील आठवडे बाजार ,शाळा, एसटी, नोकरदार वर्ग शिक्षक वर्ग असे नागरिक येजा करत असतात मात्र रस्ता दुरुस्ती बाबत निर्णय झाला नसल्याचे बोलले जात आहे.
रस्ते विकास नसल्याने सध्याचे नवनिर्वाचित आमदार सचिन कांबळे पाटील यांनी या भागात लक्ष देवून विकासाच व्हिजन तयार करावे.
गेले अनेक वर्षे पासून सोनवडी वडले नाईकबोंमवाडी मिरढे रोडवरील पूलांची उंची कमी असल्याने जोरदार पाऊस झाला तर पूल तुटण्याच्या व वाहुन जाण्याचं प्रकार घडतात या मुळे विद्यार्थीचे नुकसान दर वर्षी होते आहे.
दर वर्षी रस्ता दुरुस्ती करण्यापेक्षा नवीन रोड तयार करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.