(जावली/अजिंक्य आढाव)- सध्या विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तर अजित पवार गट , राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी संघटना अशी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार विजयी झाले.यातच जावली तुन ५१ मतांची आघाडी मिळाली होती, तालुक्याच्या राजकारणात यंदा मात्र चित्र काहीस वेगळं दिसलं यावरुन लोकमतांचा कौल कोणाकडे जाणार या कडे तालुक्यातील दिग्गज मंडळीच लक्ष लागून राहिले आहे.
तर सध्या जावली ग्रामपंचायत वर राजे गटाची सत्ता असुन ६-३ रासप अशी परिस्थिती असुन सोसायटी मध्ये १३- १ असे राजकीय समीकरण राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राखण्यात यश आले.
अजूनही ११ महिने ग्रामपंचायत निवडणूकिसाठी कालावधी बाकी असुन इच्छुकांनी मोर्चीबाधणी सुरुवात केली आहे.या बरोबरच तिसऱ्या आघाडीची हालचाली गतिमान झाल्याने निवडणुकीत मोठ्ठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.मागील निवडणुकीत राजे गट विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्ष दोन पॅनल मध्ये अटीतटीची लढत झाली होती यात राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात ९ पैकी ६ जागा जिंकत आल्या तर ३ जागा या राष्ट्रीय समाज पक्ष काशीनाथ शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आल्या होत्या.तर ओबीसी महिला आरक्षण पडल्याने ज्ञानेश्वरी मकर यांना सरपंच पद तर दादासाहेब ठोंबरे यांना उपसरपंच पद मिळाले होते.
यावर्षी मात्र आरक्षणाची बाजु कुणाला मिळणार या कडे लक्ष लागुन राहिलं आहे. अल्प कालावधीत तिसऱ्या आघाडीची चर्चा रंगु लागली आहे.सक्षम युवा तरुणपिढी राजकारणात सक्रिय करण्यासाठी हि आघाडी बनवली जात असल्याची चर्चा आहे.