हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

निरानदीवरील गितेवस्ती सह अनेक बंधारे कोरडे शेतकरी चिंताग्रस्त

 गोखळी ( राजेंद्र भागवत याज कडून ): फलटण – बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले निरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे प्रशासनाच्या नियोजनाअभावी कोरडे पडले आहेत यातील गोखळी- मेखळी नजीक गीते वस्ती येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे बंधाऱ्यातून पाणी गळती होऊन बंधारा पूर्णपणे कोरडा पडला आहे. शेतातील उभी पिके कशी जगवायची या काळजीने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. या बंधाऱ्यावर फलटण तालुक्यातील गोखळी आणि बारामती तालुक्यातील मेखळी परिसरातील संपूर्ण शेती पिके अवलंबून आहेत. सध्या शेतात ऊस कापूस , फळभाज्या , पालेभाज्या पिके आहेत कापूस काढून गहू हरभरा पेरणी करायची आहेत‌ मात्र नदीमध्ये पाणी नसेल तर गहू हरभरा पेरणी करणार कशी ? मुळात बंधारे अडवताना पाटबंधारे खात्याने शेवटच्या बंधारा भरल्यानंतर वरचा बंधारा भरणे आवश्यक असताना वरुन बंधारे अडविले तर खालच्या बंधाऱ्यामध्ये पाणी कोठून येणार सध्या नदीपात्रामध्ये धरणातून पाणी बंद आहे. नदीकाठच्या दोन्ही बाजूकडून बागायती क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असताना नदीच्या पाण्यातील पाणी पातळी कमी होत आहे .

कोरडे बंधारे भरणार कसे..? पाटबंधारे खात्याच्या बंधारे अडवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे गीते वस्ती बंधारा कोरडा राहिला आहे.गतसाली या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली पण अतिशय निकृष्ट काम झाल्याने यात पाणी राहत नाही..गळती खूप मोठी आहे..पण नवीन सोनगाव बराज अडवून गतसाली तो भरला होता…आता प्रशासनाने तात्पुरती डागडुजी काल परवा केली आहे..पण तोपर्यंत नदी प्रवाह थांबला..रिटर्न मान्सून कमी झाला त्यामुळे पाण्याची गरज आहे..आता तो पाण्याने भरुन घ्यावा अशी मागणी या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या फलटण – बारामती तालुक्यातील लाभ धारक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे… या बंधाऱ्याचे वरती असणारे घाडगेवाडी नीरा वागज हेही बंधारे भरलेले नाहीत.. पाणी उपसा सुरूच आहे.. आणि नदीतून पाणी येत नाही.. अश्या स्थितीत धरणातून पाणी उपलब्ध करून सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरायला हवेत.. तरच रब्बी पिके घेता येतील.. आणि उभा ऊस बांधणी केली आहे त्याला पाणी देणे आवश्यक आहे… पूर्वी कॅनाल चे रोटेशन लवकर मिळत होते पण गेल्या चार पाच वर्षांत नीरा उजवा डावा कालवा मधून फक्त 4.. अपवादाने 5 वार्षिक पाणी पाळ्या मिळाल्या आहेत म्हणून ऊस पीक टिकत नाही.. प्रसंगी कर्ज काढून 4/5 की मी पाइप लाइन केल्या आहेत.. त्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे… आता तातडीने बंधारा भरून देवून उभी पिके वाचवणे व रब्बी पिकांचे नियोजन करण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी बारामती – फलटण तालुक्यातील या बंदराच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांना धारक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!