आपला जिल्हा
माझ्या आठवणीतील निवडणूक : जाणिवा,संवेदना आणि जबाबदारी
(फलटण/ प्रतिनिधी)- नेहमीप्रमाणेच मला उद्या विधानसभा निवडणूकीसाठी(Election ड्युटी २०२४) जायचं होतं. गेल्या वेळीच्या लोकसभा निवडणूकीप्रमाणे सचिन ढोले साहेब निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने महिलांना त्याच्या सोयीने बूथ व घरी जाण्याची सोय असणार हे निश्चित होत. पण तरी देखील १० – २० हजार कर्मचाऱ्यां मध्ये १० – २० लोकांची गैरसोय होणं क्रमप्राप्त असतं पण कदाचित त्या दहावीस मध्ये मी असेल तर म्हणून मी राहण्याच्या दृष्टीने बॅग भरत होते. मी मतदान अधिकारी क्रमांक तीन असल्याने बॅलेट सोडणे ही मुख्य जबाबदारी माझ्यावर होती.तरी देखील ही ड्युटी म्हणजे एक टीमवर्क असतं त्यामुळे शाई लावण्याची जबाबदारी ही घ्यावी लागते. आणि जास्त प्रमाणात शाई लागली तर बोटाची कातडी जाते. म्हणून मी एक हॅन्ड ग्लोज बॅग मध्ये टाकला. तो टाकत असताना माझ्या मनात विचार आला. ट्रेनिंगमध्ये गप्पांमध्ये हा विषय झाल्याने काही महिला भगिनी तयारीने येथीलही. परंतु उरलेल्याचं काय?किंवा पुरुष कर्मचारी यांचं काय? परत विचार आला फर्स्ट एड किट तर असणारच आहे. म्हणून मी सहज OPO 255 PHaltan Vidhansabha, हा निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी साहेबांनी केलेल्या ग्रुप वर मेसेज टाकला. ‘त्या साहित्या सोबत शाई लावण्यासाठी हँड ग्लोज मिळावा ही विनंती’. माझ्या नंतर कराडच्या एका शिक्षकांनी विचारले ‘साहित्य जमा करून परत येण्यासाठी बस आहे का?’साहेबांनी लगेच त्यांना ‘हो’ असा रिप्लाय दिला.त्यामुळे आधी मला थोडं गिल्टी फील झालं. अगदी क्षुल्लक.. गोष्टीसाठी आपण मागणी केली. हे चुकलं तर नाही ना? पण एका मनानं असं समजावलं,… निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची अतिशय जबाबदारीची आणि धोक्याची ड्युटी पार पाडण्यासाठी नेमलेल्या व्यक्ती त्या दोन दिवसाची ड्युटी अत्यंत काळजीपूर्वक.. प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतात. काहीजण तर अक्षरश: धास्ती घेतात.. या ड्युटीची. निवडणुकीसाठी होत असलेला वारेमाप खर्च पाहता हॅन्ड ग्लोज चा खर्च म्हणजे अगदी क्षुल्लक आणि सर्वांच्या गरजेचा आणि उपयोगाचा आहे.चला जाऊ द्या… अशी मनाची समजूत काढून बॅग आटोपली.
वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे.. देणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्यांची हात घ्यावे……
श्रीमती अहिल्या कृष्णात भोजने,उपशिक्षिका, जि. प. प्राथमिक शाळा भिवरकरवाडी ता.फलटण जि.सातारा