हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई- जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

सातारा दि. 18 – सातारा जिल्हयातील आठ विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुरु असून दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असलेने आज दि.18/11/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा प्रचार संपुष्टात येणार आहे. सर्व राजकीय पक्ष व सर्व उमेदवारांना सुचित करणेत येते की, दि.18/11/2024 पासुन 5 नंतर प्रचार तसेच पैसे,लिकर यांचा गैरवापर व आचासंहिता भंग होईल अशा प्रकारची गैरकृत्य घडल्यास सदर व्यक्तीवर कडक कारवाई करणेत येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

आचारसंहिताबाबत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आचारसंहीतेचा भंग होण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील भागात विशेष पथके नेमणेत आलेली आहेत. त्यानुसार cVIGIL या ॲपवर आजपर्यंत सातारा जिल्यात एकूण 107 तक्रारी प्राप्त झल्या असून सर्व 107 तक्रारी निकाली काढल्या आहेत. आचारसंहिता भंग झालेबाबत प्राप्त तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करणेबाबत सर्व संबंधितांना मा. जिल्हाधिकारी यांनी सुचना दिल्या आहेत.

MCC कक्ष MCC कक्षाच्या दैनंदिन अहवालाप्रमाणे cVIGIL या ॲपवर आजपर्यंत सातारा जिल्यात एकूण 107 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व 107 तक्रारी निकाली काढल्या आहेत.तसेच 1950 या नंबरवर एकूण 11 तक्रारी दाखल सद्य स्थितीत सर्व तक्रारी निकाली काढणेत आलेले आहेत.तसेच आचारसंहिता काळात एकूण 11 FIR दाखल झालेले आहेत.
चेक पोस्टबाबत विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने शेवटचे ७२ तास महत्त्वाचे असून दारु, पैशाचा गैरवापर व मतदारांवर दबाब तंत्राचा वापर करणाऱ्या उमेदवार, व्यक्तीवर कारवाई करणेसाठी चेक पोस्ट तयार करण्यात आलेलो आहेत तेथे नियुक्त केलेले कर्मचारी व्यवस्थीत काम करत आहेत किंवा नाही? तसेच एफ.एफ.टी व एस.एस.टी पथकात नेमलेले कर्मचारी व्यवस्थित कामकाज करीत आहे किवा नाही? यांची तपासणी करणेबाबत व सर्व चेक पोस्टला भेटी देवून आचारसंहीतेच्या भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सर्व निवडणुक निर्णय अधिकारी व संबंधित पोलीस अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी सुचना दिल्या आहेत. तसेच कोणतेही लोकप्रतिनिधी अगर राजकीय पक्षाचे पदाधिकारी शासकीय कर्मचा-यांवर कारवाई करताना दबाव आणत असतील तर संबंधितांना मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचेशी याबाबत तात्काळ संपर्क साधणेबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत.

Election Seizure Mangment System

आज रोजी अखेर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हयात Seizure Mangment अंतर्गत विधानसभानिहाय कारवाई करणेत आलेली आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे
अ.क्र विधानसभा मतदारसंघाचे नांव रोकड (लाखात)
1 255 फलटण 18.99463
2 256 वाई 154.16785
3 257 कोरेगांव 32.27908
4 258 माण 15.04455
5 259 कराड दक्षिण 799.05206
6 260 कराड उत्तर 61.79999
7 261 पाटण 1.66945
8 262 सातारा 228.83475
एकूण 1311.84236

एफ.एस.टी व एस एस टी पथके
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कायदा व सुवव्यवस्था राखण्यासाठी व काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्यांचेवर कारवाई करणेबाबत व टोल फ्री नं. 1950 व्दारे तसेच सीव्हीजील ॲपव्दारे प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करणेबाबत एफ.एस.टी व एस एस टी पथकांना सूचना देणेत आल्या आहेत.
कायदा व सुव्यवस्था-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 3097 पोलिस कॉन्टेबल तसेच 2940 होमगाडर्‍ यांची नेमणूक करणेत आलेली आहे.केंद्रीय निमलष्करी दल 8 कंपनी व राज्य राखीव दलाची 1 कंपनी यांची नेमणूक केलेली आहे.

मतदान केंद्र कर्मचारी नियुक्ती

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर पुरसा कर्मचारी वर्ग पुरविणेत येणार असून यामध्ये सेक्टर ऑफीसर 436, केंद्राध्यक्ष 3956 व इतर कर्मचारी 11869 असे एकूण 16261 कर्मचारी यांची नेमणूक करणेत आलेली आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करु नये अशी बाब निर्देशनास आल्यास संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी याचेवर कडक कारवाई करण्यात येईल.मतदान केंद्रावर स्वच्छता अभियान राबविणेबाबत

सर्व निवडणुक निर्णय अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या मतदान केंद्रामध्ये स्वच्छता अभियान राबविणेबाबत कार्यवाही करावी अशा सुचना मा. जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

मतदान केंद्रावर नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांनी नम्रतापूर्वक संवाद साधणेबाबत विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने दि. 20/11/2024 रोजी मतदान होणार आहे. सदर दिवशी 3165 मतदान केंद्रावर ज्या अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करणेत आलेली आहे, त्यांनी राजकीय पक्षाचे पदाधिकारी / कार्यकर्ते व मतदार यांचेशी नम्रतापूर्वक संवाद साधणेबाबत व मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ गडबड न होणेबाबत दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

गृहभेटीसाठी नियुक्त केलेल्या टिम
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मतदानादिवशी गृहभेटीसाठी नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या टिमकडून सकाळी ९.००, दुपारी 12 वाजता व 4 वाजेपर्यंत त्यांना जवाबदारी देण्यात आलेल्या कुटुंबातील किती सदस्यांनी मतदान केलेले आहे? किती राहीलेले आहेत? याचा वेळोवेळी अहवाल ग्रामीण भागासाठी संबंधित गटविकास अधिकारी व नागरी भागासाठी संबधित नगरपालिका मुख्याधिकरी यांच्याकडून घेण्यात येऊन जास्तीत जास्त मतदान कशा प्रकारे होईल याबाबत कार्यवाही करण्यात यावी,अशा सूचना दिल्या आहेत.

गृहमतदान विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज अखेर वय वर्ष 85 च्या वरील एकूण 1914 मतदार असून त्यापैकी 1787 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच PWD मतदार एकूण 323 असून त्यापैकी 311 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित मतदार हे समक्ष केंद्रावर जाऊन मतदान करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!