हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

समाजाच्या अस्तित्वासाठी गळ्यातील सोन्याची चैनच काय पण समाजाच्या हितासाठी बलिदानास ही देऊ – माजी नगरसेवक सचिन अहिवळे

(फलटण/प्रतिनिधी)- फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असताना प्रस्थापित पक्षांच्या धन दांडग्यांच्या धनशक्ती पुढे निभाव लागण्यासाठी संविधान समर्थन समिती पुरस्कृत, प्रहार, स्वराज्य पक्षांच्या पाठिंब्यावर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार असणारे प्रा.रमेश आढाव यांना आर्थिक मदतीची गरज आहे. प्रचारात आघाडी घेतलेल्या प्रा.रमेश आढाव या प्रस्थापित पक्षांच्या धनशक्ती पुढे त्यांचा निभाव लागणं कठीण जात आहे. प्रचार यंत्रणेसाठी लागणारी आर्थिक मदत कोठून उपलब्ध होणार? आता ही लढाई फक्त प्रा.रमेश आढाव यांच्या पूर्ती मर्यादित राहिली नसून ही लढाई समाजाच्या अस्तित्वाची,आत्मसन्मानाची आणि उद्याच्या पिढीला दिशा देणारी बनली आहे. तेव्हा समाजाच्या अस्तित्वासाठी मी गळ्यातील सोन्याची चैनच काय पण समाजाच्या हितासाठी बलिदान द्यावे लागले तरी मागेपुढे पाहणार नाही असे प्रतिपादन माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी केले.

माजी नगरसेवक सचिन अहिवळे हे स्वतः प्रस्थापित पक्षांचे नगरसेवक असून त्यांनी त्यांच्या पक्षाचे आदेश धुडकावून लावत सुरुवातीपासूनच संविधान समर्थन समितीच्या बरोबर आपली निष्ठा दाखवून ते प्रचार कार्यात सक्रिय आहेत. सचिन अहिवळे हे एक नीतिमान व चारित्र्यसंपन्न असं व्यक्तिमत्व असून समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी काम केले आहे. स्वतः राजकीय कार्य करत असलेल्या प्रस्थापित पक्षाच्या आदेशाला न मानता त्यांनी समाजासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम निश्चित होणार आहे. परंतु त्याची तमा न बाळगता त्यांनीही प्रचारात आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह संविधान समर्थन समितीच्या वतीने पुढाकार घेतला आहे. प्राध्यापक रमेश आढाव यांच्या प्रचारासाठी लागणारा आर्थिक निधी कमी पडत असल्याचे दिसून आल्यानंतर माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाण ठेवून दीड लाख रुपये प्रा. रमेश आढाव यांना प्रचार कार्यासाठी सुपूर्त केले. त्यांचे मित्र व अष्टपैलू क्रिकेटपटू तथा सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांनीही आपल्या कमाईतून पन्नास हजार रुपयांची मदत प्रा.रमेश आढाव यांच्या प्रचार कार्यास केली आहे.
यात आवर्जून उल्लेख करावा लागेल ते संविधान समर्थन समितीचे एक झुंजार नेतृत्व सनी काकडे यांच्या वडिलांचे निधन झालेले असताना सुद्धा आपले दुःख कवटाळत न बसता त्यांनी समाजाच्या अस्तित्वाच्यासाठी व आत्मसन्मानासाठी प्रचारात सहभागी होऊन सगळ्यांसमोर एक उदाहरण घालून दिले आहे.

एक निर्धार बौद्ध आमदार हा संकल्प केलेल्या संविधान समर्थन समितीला स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, स्वराज्य पक्षांच्या कार्यकर्त्यांची मदत मिळत असून ते पहिल्या दिवसांपासून प्रचार कार्यात सहभागी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!