(फलटण/प्रतिनिधी) फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दिपक चव्हाण यांना साखरवाडी परिसरातील गावांमधून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून साखरवाडी जिंती, मुरुम ,फरतडवाडी असा गावातील धनगर समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने साखरवाडी जिंती फडतरवाडी व पंचक्रोशीतील सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत असे निवेदन देण्यात आले आहे,आ.दिपकराव चव्हाण , श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा),श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर(बाबा), श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर(बाळराजे), श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर(बाबा) यांनी केलेल्या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या गावी मौजे मुरुम या ठिकाणी सुभेदार मल्हारराव होळकर यांचे भव्य स्मारक व सुशोभीकरणासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. तसेच जिंती साखरवाडी फडतरवाडी व पंचक्रोशीतील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेले बिरोबा मंदिर मौजे जिंती या मंदिराचे व परिसराचे सुशोभीकरण केले. या केलेल्या सर्व कामांमुळे सर्व सकल धनगर समाज आपणास जाहीर पाठिंबा देत आहोत.