हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

बोलक्या बाहुल्यांपेक्षा फलटण तालुक्यातील जनतेला प्रा.रमेश आढाव यांच्या रूपाने सक्षम पर्याय – सचिन आहिवळे

(जावली/अजिंक्य आढाव)२५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील प्रस्थापित पक्षातील व इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांचा विचार केला तर तालुक्याला एक सक्षम, प्रगल्भ, मुत्सद्दी राजकीय व्यक्तिमत्त्वाची गरज असल्याचे आपल्याला प्रकर्षाने जाणवते.या सर्वाचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्तीमत्व येऊन जाते ते म्हणजे प्रा.रमेश तुकाराम आढाव.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते आज इथपर्यंत पोहोचले आहेत. इथल्या राजकीय व्यवस्थेच्या जातीयवादी भूमिकेमुळे ते आज याच प्रस्थापित पक्षाचे उमेदवार म्हणून याच पक्षाच्यावतीने उभे नाहीत. परंतु ज्यांच्या हजारो पिढ्या संघर्षातून निर्माणाची भूमिका आज तागायत बजावत आल्या आहेत त्यांनी कशाचीही तमा न बाळगता संविधान समर्थन समिती पुरस्कृत, प्रहार, शिवराज्य आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार म्हणून या मतदारसंघातून आपली निवडणूक लढवण्याचे निश्चित केले ते व्यक्तिमत्व म्हणजे प्रा.रमेश तुकाराम आढाव. त्यांना निवडून आणण्यासाठी बौद्ध, ओबीसी,भटक्या विमुक्त, गरीब मराठा समाजातील मतदार बंधू – भगिनींनी मतदान देऊन निवडून आणण्याचा शब्द दिला आहे. प्रा.रमेश आढाव हे या मतदारसंघातून निवडून आले म्हणजे ही लढाई इथेच संपणार नाही. कारण ही लढाई प्रस्थापित व्यवस्थेने एका समाजाला राजकीय हक्कांपासून उपेक्षित वंचित ठेवले आहे. तो समाज आज आपल्या राजकीय हक्कासाठी प्रस्थापित पक्षांची व त्यांच्या नेत्यांशी दोन हात करायला पुढे सरसावला आहे. प्राध्यापक रमेश आढाव यांनी होणाऱ्या परिणामांची चिंता कधीच केली नाही.त्यांनी देशाचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांनी भारतीयरेल्वे, दूरसंचार विभागात सल्लागार म्हणून दिलेली जबाबदारी अत्यंत जाणीवेने व जबाबदारीने पार पाडली.१९९७ मध्ये फलटण मधून बीटी जगताप व प्राध्यापक रमेश आढाव यांना दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद समितीच्या सल्लागारपदी त्यांना नियुक्त या समितीवर गोवा महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा कार्यभार विशेष म्हणजे महाराष्ट्रातून या दोघांचीच निवड या समितीवर झाली फलटण बारामती लोणंद रेल्वे मार्गाचा प्रस्ताव दिल्याचा व आपल्यामुळेच रेल्वे मंजूर झाल्याचा कांगावा अनेकजण करत असतात. पण फलटणकर यांना हे माहीत नाही की दिनांक २६ जून १९९६ ला बीटी जगताप व प्राध्यापक रमेश शाळा यांनी एक शिष्टमंडळ घेऊन मुंबई या ठिकाणी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री राम विलास पासवान यांची भेट घेऊन यासंबंधी प्रस्ताव दिला होता. त्यानंतर २४ ऑगस्ट १९९६ ला ते स्वतः या संबंधित दिल्लीला भेटले.२१ नोव्हेंबर १९९६ ला तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांनी हा रेल्वे मार्ग मंजूर झाल्याचे घोषित केले.

प्रा. रमेश आढाव यांनी गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते भारत सरकारच्या रेल्वे व दूरसंचार विभागात सल्लागार म्हणून उत्कृष्ट काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. एकता दर्शन या आपल्या साप्ताहिक पासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. आज ते आघाडीच्या वृत्तपत्रासाठी काम करत असून पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करत आहेत. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कला,क्रीडा, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये जनतेशी थेट संबंध असणारे ते उमेदवार आहेत. सत्ता, संपत्ती,आणि प्रतिष्ठा यांच्यापायी प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांनी बोलक्या बाहुल्या उभ्या केल्या आहेत. हेच प्रस्थापित पक्षाचे नेते जेवढी चावी त्यांना देतील तेवढेच ते हलणार डुलणार आहेत. त्यामुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला प्रा.रमेश आढाव यांच्या रूपाने एक सक्षम पर्याय उभा राहिला आहे. फलटणमध्ये शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध हव्यात यासाठी एक संकुल उभारण्याचा मनोदय त्यांनी ठेवला आहे. फलटणची क्रीडा संस्कृती पाहता या ठिकाणी सुसज्ज स्टेडियम असावं. जिल्हा परिषदेच्या शाळांना आज उतरती कळायला लागली आहे त्या शाळा दिल्ली सरकारच्या धरतीवर त्याचं नूतनीकरण करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांसाठी मोफत वीज कशा पद्धतीने देता येईल याचाही विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, पिक विमा असेल, त्यांना खतासाठी व बी बियाण्यासाठी मदत असेल या गोष्टीही येणाऱ्या काळात करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्ती चा प्रश्न हा विधानसभेत मांडून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला आहे. गावोगावी उभारण्यात आलेल्या व उभारण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाचे रूपांतर अभ्यासिकेमध्ये कसे करता येईल व त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कशी उभी करता येईल याचाही त्यांनी कृती कार्यक्रम तयार केला आहे. फलटण मध्ये सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व मागासवर्गीय समाजातील मुलांना सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीने सुसज्ज स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. बौद्ध समाजासाठी दरवर्षी एका मोठ्या बौद्ध धम्म परिषदेचा आयोजन करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व पाणंद रस्ते असतील किंवा तालुक्याला व जिल्ह्याला जोडणारे सर्व रस्ते अद्यावत करून सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तालुक्यातील जलजीवन मिशनच्या रखडलेल्या योजना चर्चेतून मार्ग काढून पुन्हा त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यातून सर्व तालुक्यातील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. गावगाड्यातील छोट्या गाव कामगारांना उद्योग धंद्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.त्यांच्यासाठी कला, कौशल्य विकसित होण्यासाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केली जातील. प्रत्येक गावात जलसंधारणाची व मृदासंधारणाची कामे करून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. अशा अनेक कल्याणकारी योजना प्रा.रमेश आढाव यांच्या दूरदृष्टीतून साकार होतील.

आज जनतेचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावोगावी त्यांचे स्वागत होत आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध असल्याने जनशक्ती मात्र प्रा.रमेश आढाव यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. गाव खेड्यातील माता-भगिनी आपल्या कष्टातून त्यांना आर्थिक मदती करत आहेत. ही लढाई आत्मसन्मानाची व स्वाभिमानाची बनली असून निस्वार्थी भावनेने जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. गावोगावी घर ते घर व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन बैठकांचे सत्र सुरू आहे. कार्यकर्तेही कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वतः पदरमोड करून प्राध्यापक रमेश आढाव यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धनंजय महामुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे पहिल्या दिवसांपासून रात्रीचा दिवस करून प्राध्यापक रमेश आढाव्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे प्राध्यापक रमेश आढाव यांची निशाणी आहे रोड रोलर त्यांचे नाव मतदान यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्यांना भरघोस मताने निवडून देऊन जनसामान्य जनतेची व तालुक्याच्या विधायक विकासासाठी सेवा करण्याची संधी द्यावी. तर आणि तरच जनतेच्या न्याय हक्कांसाठी विधानसभेमध्ये हक्काचा आवाज घुमेल. तेव्हा संविधान समर्थन समिती पुरस्कृत,स्वराज्य पक्ष,प्रहार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार प्रा.रमेश आढाव यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन विधानसभेमध्ये पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!