(जावली/अजिंक्य आढाव)अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघात श्रद्धेय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदाच या मतदारसंघात अनुसूचित जातीतील 59 जाती पैकी दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणाऱ्या मातंग समाजातील उमेदवार माझ्या रूपाने दिला आहे. राज्यातील महायुती व महाविकास आघाडी हे मातंग समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांच्या जवळच्या बगलबच्च्यांची मदत घेत असून गाव खेड्यात राहणारा आमचा मातंग बांधव हा वंचित बहुजन आघाडी सोबतच असल्याचे चित्र स्पष्ट आहे. महायुतीच्या सरकारने बार्टीच्या धरतीवर आर्टीच्या निर्मिती केली असली तरी त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिलेला नाही. एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाअंतर्गत वर्गीकरण व क्रीमिलियर लावण्याचे अधिकार हे राज्य सरकारला देण्यात आले. आमची भोळी भाबडी जनता त्या निर्णयाने खुश झाली.
परंतु याच निर्णयांमध्ये क्रिमिलियर लावण्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने केलेली टिपणी आमच्यासाठी धोकादायक ठरले आहे. ज्या कुटुंबामध्ये व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला आहे त्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला त्या आरक्षणांतर्गत लाभ मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणासोबत अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण धोक्यात आले आहे. या मुद्द्यावर राज्यातील माहिती सरकारने निवडणूक जाहीर होण्याअगोदर रात्रीच्या अंधारात एक समिती नेमून हे क्रिमिलियर कशा पद्धतीने लावता येईल यासाठी अध्यादेश काढला. यामध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांची नेमणुकी करण्यात आली. या निर्णयाविरुद्ध फक्त श्रद्धेय ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढत आहेत. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोघांनी संगणमत करून अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे. त्यांनी यापूर्वी ओबीसीच्या आरक्षणालाही मुठमाती दिली आहे. तेव्हा येणाऱ्या काळात या विधानसभा निवडणुकीत २५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण मातंग समाज हा वंचित बहुजन आघाडी सोबत असून तो आपले राजकीय हक्क स्थापित करण्यासाठी व राज्यघटनेने दिलेला आपला आरक्षण टिकवण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मातंग समाज हा गावगाड्यातील प्रमुख समाज असून त्यांना राजकीय हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मतांवर डोळा ठेवून राज्य सरकारने काही निर्णय घेऊन मातंग समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा मातंग समाजातील बांधवांनी आपल्या राजकीय हक्कांसाठी वंचित सोबत राहून आपल्या घटनेने दिलेल्या आरक्षणाच्या अधिकारासाठी लढले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे उलटले तरी आजही मातंग समाजातील आमच्या बांधवांना स्मशानभूमी ही उपलब्ध करून दिली जात नाही. यासाठी दलित संघटनांना आंदोलन करावे लागते. यासाठी कोणताही प्रस्थापित पक्ष किंवा त्याचे नेते या आंदोलनात सहभागी होत नाहीत. त्याला फक्त आमच्या समाजाची मत हवी असतात. आमच्या समाजाचे न्यायी हक्क त्यांना मान्यच नाहीत. आमच्या मातंग समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असला तरी तो आज जागृत होत आहे. आमचे काही स्वार्थी दलाल नेते हे प्रस्थापित पक्षांच्या वळचणीला गेले असले तरी सामान्य जनता मात्र माझ्यासोबत आहे. तेव्हा या मतदारसंघातील संपूर्ण मातंग समाजात सोबत आहे. तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी या मतदारसंघात निवडणूक लढवत असून माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर तेव्हा गॅस सिलेंडर या चिन्हा पुढे बटन दाबून संपूर्ण तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी मला द्यावी.