(जावली/अजिंक्य आढाव)आपण संघटित झालेलो व्यवस्थेला पटत नाही. जेव्हा आपण संघटित होतो तेव्हा कोणाचातरी एकाचा फायदा होणार आहे आणि कोणाचा तरी एकाचा तोटा होणार आहे. परंतु त्यांच्या फायद्या तोट्यासाठी आपल्या समाजाचा पण नुकसान का करायचे? आज जर आपण संघटित झालो नाही आणि भविष्यात आपली ताकद जर इतर प्रस्थापित पक्षांना दिसली नाही तर ते आपल्या ला कुठल्याही स्वरूपाची मदत करणार नाहीत. ते आपल्याला त्यांच्या बेरजेत धरणारी नाहीत. परंतु आत्ता जर आपली ताकद त्यांना दिसली तर भविष्यामध्ये प्रस्थापित पक्षांना व त्यांच्या नेत्यांना आपल्या समाजाचा विचार हा करावाच लागणार आहे. तेव्हा ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे. येणाऱ्या पिढीला आपण कोणता वारसा देणार आहोत. फुले शाहू आंबेडकर यांनी आपल्या अखंड आयुष्यामध्ये संघर्ष करून आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी जो मार्ग सुकर केला आहे तो येणाऱ्या पिढ्यांसाठीही आपल्याला सुकरच ठेवावा लागणार आहे. नाहीतर येणारे पिढी आपल्याला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपलं संघटन, आपला विचार हा जिवंत ठेवून आपल्याला आपला संघर्ष करावा लागणार आहे.
आपली विचारधारा ही फुले,शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आहे. येणाऱ्या काळात आपलं राजकारण हे फक्त बौद्ध समाजापुरतं सीमित न राहता ते इथल्या सामान्य गरीब मराठा समाजापासून ते गाव खेड्यातील भटक्या – विमुक्त इतर मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी व त्यांच्या विधायक विकासासाठी राहील. आपलं संघटन हे संविधान समर्थन समिती असल्यामुळे इथल्या मुस्लिम व अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय हक्कांसाठी आपण लढणार आहोत. त्यांच्या मनामध्ये जे भीतीच वातावरण आहे त्यांच्या आपण कायम पाठीशी राहणार आहोत.
आपल्या सर्वांना मी एवढेच सांगेन की कोणत्याही दबावाला व प्रेशरला बळी पडू नका. आपलं मतदान हे गुप्त मतदान असणार आहे त्यामुळे कोणालाही घाबरायचं काही कारण नाही. आपण दिलेला उमेदवार हा स्वच्छ प्रतिमेचा व फुले,शाहू,आंबेडकर विचारधारेचा प्रगल्भ विचाराचा असल्यामुळे आपली ती जमेची बाजू आहे. तेव्हा येणाऱ्या २० तारखेला तुम्ही एकट्यानेच नव्हे तर आजच्या कुटुंबाने एकत्र जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे. मतदान यंत्रावर आपल्या उमेदवाराचे नाव पाचव्या क्रमांकावर असून आपली निशाणीही रोड रोलर आहे. तेव्हा घरातील शिकलेल्या मुलांनी आपल्या आई-वडिलांना आजी-आजोबांना हे चिन्ह व्यवस्थित दाखवून मतदान करण्याच्या सूचना द्या. प्राध्यापक रमेश आढाव यांना प्रचंड बहुमताने विजय करून हा विजय फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेला आपण समर्पित करू.