हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

प्रा.रमेश आढाव यांच्या उमेदवारीने जनतेमध्ये उत्साह! जनतेकडून मिळतोय भरघोस पाठिंबा!

(जावली/अजिंक्य आढाव)२५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष,इतर छोटे मोठे पक्ष व अपक्ष यांनी प्रचाराचा जोर वाढवला असून संपूर्ण विधानसभा मतदारसंघ हा भेटीगाठी, कोपरा सभा, घोंगडी सभा, पदयात्रा व प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा यांनी फुलून गेला असून आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. मतदार संघातील सामान्य जनतेने मात्र यावेळी सावध पावित्र्य घेऊन येणाऱ्या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षातील नेत्यांचा,पुढार्‍यांचा हिशोब चुकता करण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे. सामान्य जनतेच्या तोंडी हे ऐकायला मिळत आहे की, नेते जर आपली निष्ठा तत्त्व विसरून बदलत असतील तर सामान्य जनतेने सुद्धा का बदलू नये? असा सूर निघू लागला आहे.

प्रस्थापित पक्षातीच्या महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये काटे की टक्कर असून सर्वांनीच आपली जिंकण्यासाठीची रणनीती, आपले हुकमी एक्के बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व त्यांचे बंधू समशेर नाईक निंबाळकर, पत्नी ॲड.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांचे नेते कार्यकर्ते आता कसून कामाला लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजे गटाचे पुरस्कर्ते व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांना चौथ्यांदा निवडून आणण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर,त्यांच्यासोबत सह्याद्री चिमणराव कदम, महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय भोसले यांनीही आपल्या प्रचाराचा जोर वाढवला आहे. या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांसमवेत आणखी काही उमेदवार या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


इतर उमेदवारांमध्ये बौद्ध समाजाचे संविधान समर्थन समिती पुरस्कृत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा.रमेश आढाव यांनीही प्रचारात मुसंडी मारली असून त्यांनाही जनतेचा भरघोस पाठीमा मिळताना दिसत आहे. प्रा. रमेश आढाव हे फलटणमधील जेष्ठ पत्रकार असून फुले,शाहू,आंबेडकर विचारधारेला मानणारे असल्याने त्यांचा जनसामान्यांमध्ये आदर आणि इतर सर्व समाजासोबत सामाजिक सलोखा आहे. ते मुरब्बी राजकारणी, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विषयाचे जाणकार आणि हाडाचे पत्रकार असून समाजाची नस त्यांना माहित आहे. 255 फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदार संघ असताना गेल्या तीन टर्म मध्ये बौद्ध समाजाला उमेदवारी नाकारल्यामुळे बौद्ध समाजाच्या पाठिंब्यावर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ते ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर धन शक्तीचे मोठे आव्हान आहे. तरीही लोकांच्या पाठिंब्यावर ते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचत असून त्यांना सामान्य जनतेचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रा.रमेश आढाव यांचा राजकारण, समाजकारण याचा चांगला अभ्यास असल्याने त्यांनी सुनियोजित पद्धतीने आपल्या सोबत कार्यकर्ते घेऊन प्रचाराचा सपाटा लावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सामान्य जनतेच्या आशा पल्लवीत झाले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे बौद्ध समाजाचाही त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. प्रस्थापित राजकारणी समाजातील दुर्बन घटकांना धनाचे आमिष दाखवून आपल्याकडे खेचण्याचे काम करीत आहेत. परंतु यावेळी बौद्ध समाजाला तिकीट नाकारल्याने लोकांच्या मनात रोष असल्यामुळे लोक धनशक्तीच्या पुढे झुकताना दिसत नाहीत. त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरुद्ध स्वाभिमानाची लढाई बनली आहे.

प्रा.रमेश आढाव हे समाजाच्या आत्मसन्मानासाठी लढत आहेत. अनेक ठिकाणी मतदान देण्याच्या आश्वासनासोबत आपल्या कमाईतून आर्थिक मदत ही प्रा. रमेश आढाव यांना केली जात आहे.
प्रा.रमेश आढाव यांची खूण आहे रोड रोलर हा आता घरोघरी पोहोचला असून पाच क्रमांकावरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करण्याचा संकल्प सामान्य जनतेने केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते प्रा.रमेश आढाव यांच्या प्रचारांमध्ये सक्रिय झाले असून त्यांनीच ही लढाई सामान्याच्या न्याय हक्कांसाठी असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!