हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेचा मंगळवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश :फलटण येथील शिंपी समाज विठ्ठल मंदिर येथे पहिला मुक्काम

(फलटण/ प्रतिनिधी )- भागवत धर्म प्रसारक मंडळ , पालखी सोहळा पत्रकार संघ , नामदेव समाजोन्नती परिषद व समस्थ नामदेव शिंपी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रा मंगळवार दि . १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता साधुबुवाचा ओढा , राजुरी येथे सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून सोहळा सायंकाळी फलटण मुक्कामी विसावणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली

संत ज्ञानदेव व संत नामदेव महाराज यांनी १२ व्या शतकात उत्तर भारतात जावुन श्री विठ्ठल भक्तीचा व भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला आहे . संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची घुमाण येथे वस्त्र समाधी आहे . मुगल सम्राट मोहंमद तुघलक यांचे नातु फिरोजशा तुघलक यांनी घुमाण येथे संत नामदेव महाराज यांचे भव्यदिव्य मंदिर उभारले आहे . हा विठ्ठल भक्तीचा व शांती , समता व बंधूता हा भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी ही यात्रा काढली जाते . यात्रेचे हे तिसरे वर्ष असून महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , हरियाणा व पंजाब राज्यातुन प्रवास करीत ही यात्रा सोमवार दि . २ डिसेंबर रोजी चंदिगड पंजाब येथे पोहोचणार आहे . पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे पंजाब राज्यात राजभवन येथे या यात्रेचे स्वागत करणार आहेत . ही यात्रा बुधवार दि . ४ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे पोहोचेल .
राजुरी येथे सातारा जिल्ह्यातील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून सायंकाळी सोहळा श्री विठ्ठल मंदिरात विसावणार आहे . सातारा जिल्ह्यातील सर्व नामदेव शिंपी समाज व भाविकांच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.

तरी भाविक भक्तांनी संत नामदेव पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन
शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट, शिंपी समाज महिला मंडळ व फलटण नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!