(फलटण/ प्रतिनिधी): मौजे सासकल तालुका फलटण येथे अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक त्यांना अभय देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे वारे सुरू असून आचारसंहितेच्या काळातही पोलीस प्रशासन दारू विक्रेत्यांना अभय देत असल्याचं पाहून लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सासकल मधील तरुण पिढी या दारूच्या आहारी जात असून त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची काळजी वाटत आहे. गावातील महिलांनी नुकतीच सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन याविषयी मदत करण्याचे आवाहन केले आहे.अखंड हरिनाम सप्ताह च्या माध्यमातून हेच दारू विक्रते स्वतःला पांडुरंगाचे भक्त असल्याचे दाखवून व सामाजिक कार्यकर्ते असल्याचा दाखवून अवैधरित्या राजरोसपणे दारू विक्री करत आहेत. याच दारू विक्रेत्यांच्या सहकाऱ्यांनी व ग्रामपंचायतीच्या त्यांच्या समर्थक लोकप्रतिनिधींनी लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान भाजप पक्षाचा प्रचार करत असताना लोकांना पैसे व घरोघरी मटन वाटण्याचं काम केले आहे. त्याही वेळी लोकांनी याच कार्यकर्त्यांना फटकारले होते. गावच्या यात्रेच्या दरम्यान याच दारू विक्रेत्यांनी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यांच्या साक्षीने दारू न विकण्याचा निर्धार केलेला होता परंतु तो निर्धार एक आठवडाभरच राहिला. त्यांच्यात अवैधरित्या दारू विक्रीमुळे इतरही दारू विक्री करणारे त्यांच्याकडे बोट दाखवत आहेत.
येणाऱ्या काळात अवैधरित्या होणारी दारू विक्री थांबली नाही तर सर्व महिला प्रतिनिधी पोलीस स्टेशन व निवडणूक निर्णय अधिकारी फलटण यांच्याकडे अर्ज करणारा असून धरण धरणार आहेत. आचारसंहितेच्या काळातही राजरोसपणे दारू विक्री करणाऱ्यांना कोणाचे अभय आहे? कोणत्या राजकीय पक्षाचे हे कार्यकर्ते असल्याने त्यांना अभय मिळत आहे? लोकप्रतिनिधींनी ही असल्या लोकांना या अवैध दारू विक्रीसाठी मदत न करता त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना द्यावी. पोलीस प्रशासनाने ही तातडीने सदर व्यक्तींना कडक सूचना देऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्याची गरज आहे. तालुका स्तरावर न्याय नाही मिळाला तर जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांनाही लवकरच महिलांचे शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडणार आहेत.