आपला जिल्हा
फलटण शहर पोलीस व RTO बोगस महाराष्ट्र शासनाच्या गाडीवर कारवाई करणार का.? सातारा पोलीस व फलटण RTO प्रतिष्ठा पणाला लावणार का.?

( फलटण /प्रतिनिधी):-फलटण शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरात अनेक शासकीय कार्यालये आहेत.व संबंधित सर्व कार्यालयाला महाराष्ट्र शासन असे बोर्ड लावलेली चारचाकी वाहने आहेत.
फलटण शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अनेक बोगस चारचाकी वाहने फिरताना दिसत आहेत.आज शनिवारी फलटण शहरातील महावीर स्तंभा जवळ मारुती सुझुकी कंपनीची एम.एच.१२.यु.एन.७०४६ ही इर्टिका चारचाकी गाडी महाराष्ट्र शासन असे रेडियम मध्ये बोर्ड लावून फिरत आहे.
मात्र आज शनिवार असल्याने सर्व शासकीय कार्यालये यांना सुट्टी आहे.मग ही गाडी कशी फिरत आहे.या चर्चेला उधाण आले आहे .
संबंधित चारचाकी वाहनावर गेल्या काही दिवसांपुर्वी ०५ ऑगस्ट २०२४ रोजी सातारा पोलीस यांनी वेग मर्यादा २००० रुपये दंड ठोठावला आहे.संबंधित चारचाकी वाहन हे नक्कीच, अवैध गुटखा,गांजा,ड्रग्स् वाहत असल्याची चर्चा महावीर स्तंभा जवळ दबक्या आवाजात चालू होती.