गोखळी ( प्रतिनिधी): १४ आक्टोबर रोजी जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धा छत्रपती शाहु स्टेडीयम सातारा येथे संपन्न झाल्या यामध्ये पाच पांडव माध्यमिक आश्रमशाळा अलगुडेवाडी (ता.फलटण)च्या खेळाडूंनी विशेष प्राविण्य दाखवीत विजय संपादन केला.19 वर्ष वयोगट मुली तीन हजार मीटर चालणे, क्रिडा प्रकारात श्रेया कचरे प्रथम क्रमांक तर साक्षी कांबळे द्वितीय क्रमाक मिळवला असून या दोघींची निवड विभागीय स्पर्धसाठी झाली आहे . 19 वर्ष वयोगट मुले पाच हजार मीटर चालणे या क्रिडा प्रकारात सुनिल पांढरे याने प्रथम क्रमांक तर संग्राम मदने याने तृतीय क्रमांक संपादन केला. असून सुनिल पांढरे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आह
17 वर्ष वयोगट मुली या मध्ये कल्याणी कोकरे हिने द्वितीय क्रमांक संपादन केला असुन तिची विभागीय सर्वसाठी निवड झाली आहे .17 वर्ष वयोगट मुले यामध्ये माळसिध्द तांबे द्वितीय क्रमांक विभागीय स्पर्धसाठी निवड तर सुरज जाधव याने तृतीय क्रमाक संपादन केला आहे. सर्व विजयी खेळाडूंना क्रिडा प्रशिक्षक प्रदिप जाधव सर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे . संस्थेचे अध्यक्ष महादेव नाळे , मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.