(जावली/ अजिंक्य आढाव)- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी कोळकी (ता.फलटण) येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार मित्रांसोबत चर्चा करण्यासाठी, मतं जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला तालुक्यातील शंभर टक्के पत्रकारांनी उपस्थिती दर्शवत “प्रा.रमेश आढाव सर तुम्ही लढा आम्ही सोबत आहोत” अशी भूमिका बोलून दाखवली.
तालुक्यातील एक पत्रकार आमदार होत असेल तर आम्हाला आनंद आहे. यापूर्वीही आपल्या तालुक्यातून एक अभ्यासू पत्रकार म्हणुन स्व.हरिभाऊ निंबाळकर हे विधिमंडळात निवडून गेले आहेत, त्यामुळे पत्रकारसुद्धा जनतेतून आमदार होऊ शकतो हा इतिहास आहे. सध्या इच्छुक उमेदवारांचा विचार केला तर नक्कीच आढाव सर सर्वश्रेष्ठ ठरतील. विधानसभा निवडणूक सोप्पी नाही आणि अवघडही नाही. आपल्याला प्रमुख पक्षाचे तिकीट असणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्व मतदारारांपर्यंत जाणे गरजेचे आहे. राजकीय पक्ष प्रमुखांसोबत बोलणे गरजेचे आहे. आर्थिक गणित जुळवणे गरजेचे असून आम्ही आर्थिक मदतही करू सरांची उमेदवारी असेल तर जास्त वेळ देवू आढाव सरांनी आजपर्यंत अनेकांना मार्गदर्शन करत पत्रकार घडविण्याचे काम केले आहे. पत्रकार हा समजतील विशेष घटक मानला जातो, जर आढाव सरांना उमेदवारी मिळत असेल तर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील. अनेक वर्षे आपण राजकारण लिहत आहोत. ह्यावेळी आढाव सरांसाठी लिहू , तालुका पिंजून काढू. पत्रकार हा राजकारणात आला तर तो पत्रकार राहतो का? ह्याचे संशोधन करणे गरजेचे असले तरी आढाव सरांसाठी आम्ही तन मन धनाने काम करू. आढाव सर कोण आहेत हे तालुक्याला सांगण्याची गरज नाही. त्यांना तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळे ओळखतात. आढाव सर तुम्हाला आम्ही निवडून आणू आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधुन घेऊ एक पत्रकार आमदार झाला, असा संदेश महाराष्ट्रात देण्यासाठी आपण कामाला लागु, अशा प्रतिक्रिया बैठकीसाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी व्यक्त केल्या.
यावेळी फलटण तालुक्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, युट्यूब माध्यमातील सर्व तरुण, युवा, ज्येष्ठ पत्रकार बांधव उपस्थित होते.