हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

ट्रॅक्टर चोरी करणा-या आंतरजिल्हा टोळीचा फलटण ग्रामीण पोलीसांकडुन पर्दाफाश ; तिघांना अटक

65 लाख रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त

(फलटण/ प्रतिनिधी)- ट्रॅक्टर चोरी करणा-या आंतरजिल्हा टोळीचा फलटण ग्रामीण पोलीसांकडुन पर्दाफाश करत ट्रॅक्टर चोरीचे ०७ व मोटार सायकल चोरीचा ०१ असे एकुण ०८ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकुण ६४,७०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करत चोरी करणा-या टोळीतील एकुण ०३ जण अटक करण्यात आले आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. ९३४ / २०२४, भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३०३ (२),३(५) मधील फिर्यादी विजय दिपक राजे पांढरे, रा. लक्ष्मीनगर, फलटण यांचे मालकीचा, सुमारे ६ लाखरु पये किंमतीचा, महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर सोमंथळी, ता. फलटण येथुन दि. १५/०९/२०२४ रोजीचेसायंकाळी ५.०० ते दि. १६/०९/२०२४ रोजीचे सायकाळी ७.०० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे तक्रारीवरुन प्राप्त झाल्यानंतर वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा हा रात्रीच्या वेळी घडला असल्यामुळे सुरुवातीला पोलीसांकडे आरोपीं बाबतकाहीही माहिती अगर धागेदोरे नव्हते. तक्रारदार यांना सुद्धा संशयितांबाबत काहीही सांगता येत नव्हते.अलिकडच्या काळामध्ये फलटण तालुका व परिसरामध्ये ट्रॅक्टर चोरीच्या अनेक घटना सातत्याने घडतहोत्या. पोलीसांनी या सर्व घटनांचा बारकाईने व सखोल अभ्यास केल्यावर असे निदर्शनास आले की,संशयित आरोपींनी पहिल्यांदा चोरी करावयाच्या ट्रॅक्टरचे पार्किंगचे ठिकाण व ट्रॅक्टरची चोरी केल्यानंतर तो घेऊन जाण्याचा मार्ग याची रेकी करुन नंतर ट्रॅक्टरच्या चो-या केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीसांनी फलटण तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या चो-या झालेल्या ठिकाणांवरील सी. सी. टी. व्ही. कॅमेरे फुटेज व तांत्रिक माहितीचा अभ्यास करुन संशयित आरोपी १) सुरज शंकर मदने वय ३५ वर्ष २)अनिकेत महेश जाधव वय २० वर्ष, दोघे रा. खडकवस्ती, सगोबाचीवाडी, पोस्ट पणदरे, ता.बारामती, जि. पुणे यांना निष्पन्न करुन त्यांना अटक केले. त्यांच्याकडे ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यांच्याअनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची माहिती दिली परंतु नंतर पोलीसीखाक्या दाखवताच त्यांनी त्यांचा साथीदार राजेंद्र मारुती जाधव वय ३० वर्ष, रा. ढाकाळे, ता.बारामती, जि. पुणे यांचे साथीने ट्रॅक्टर चोरीच्या एकुण ०७ गुन्ह्यांची व मोटार सायकल चोरीच्या ०१गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!