गोखळी ( प्रतिनिधी) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवाला मोठ्या भक्ती भावाने प्रारंभ झाला असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. उत्सवाच्या निमित्ताने पूर्व भागातील प्राथमिक , माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी. मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करतात.कार्यक्रमाबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गत पंधरा वर्षांपासून या ठिकाणी तुळजाभवानी नवरात्रोउत्सवाची परंपरा सुरू आहे .गुरुवार दिनांक ३ तारखेला घटस्थापने पासून उत्सवाला प्रारंभ झाला असून दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज सकाळी नित्योपचार अभिषेक पूजा करून देवीची आरती होते . देवीच्या आरती समयी खटकेवस्ती आणि पंचक्रोशीतील महिला, पुरुष लहानपणापासून थोरांपर्यंत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. मंदिराच्या भोवती रंगीबेरंगी फुलाची आरास, मंदिरावर आणि मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भावी भक्तांना दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे .
खटकेवस्ती येथील तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस येथील भाविक भक्त नवरात्र उत्सवाच्या काळात दर्शनासाठी येतात.फलटण- आसू मार्गांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दररोज एसटी बसेस ये जा करतात, शिवाय बारामती आगारातून बारामती- आसू – बरड बसेस ये जा करतात यामुळे तालुक्याच्या बाहेरच्या भाविकांची सोय होत आहे.
याचा भाविक लाभ घेत आहेत.यावर्षी देवीची पालखी छबिना मिरवणुकीत डॉल्बी ऐवजी पारंपारिक डफडे,ढोल, ताशा,वाद्य, बँड असणार आहे असे.या तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे संस्थापक पै. रामभाऊ नाना गावडे यांनी सांगितले. खटकेवस्ती बरोबरच तालुक्याच्या पूर्व भागातील राजाळे येथील श्री जानाई देवी , निंबळक येथील निमजाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. नवरात्र उत्सवानिमित्त राजाळे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.