हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

जेष्ठ पत्रकार प्रा रमेश आढाव यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी तालुक्यातील जनतेसह पत्रकारांची मागणी

(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात सतत कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव गेली अनेक वर्षे आपल्या लेखणीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील गरजू व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करत असून तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांची माहिती असलेल्या अशा अभ्यासू, स्थानिक व्यक्तिमत्त्वाला फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर त्या संधीचे रूपांतर तालुक्याच्या सर्वांगीण विकासात होईल, असा विश्वास सर्वसामान्य जनता बोलून दाखवत आहे.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी २००९ पासून राखीव आहे. राखीव मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर गेली १५ वर्षे (तीन टर्म) बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील बौद्ध समाजाच्यावतीने संपूर्ण मतदारसंघात संवाद अभियानांतर्गत समाज एकसंघ करत दि. २५ ऑगस्ट रोजी विविध विविध जाती धर्मातील पदाधिकाऱ्यांच्या, हजारो बांधवांच्या उपस्थितीत महामेळावा पार पडला, त्यानंतर २००४ पासून विधानसभेसाठी चर्चेत असलेले प्रा.आढाव यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

फलटण तालुक्यातील गुणवरे (ता. फलटण) ग्रामपंचायतचे मा.उपसरपंच व विद्यमान सदस्य, फलटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील विविध पुरस्कारप्राप्त असलेले व्यक्तिमत्त्व, विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील सर्व समाजातील घटकांसोबत असणारा स्नेह, तगडा जनसंपर्क, सर्वसामान्यांच्या मनातील सच्चा माणूस म्हणुन प्रा.रमेश आढाव यांच्याकडे पाहिले जात आहे. प्रा.आढाव यांना उमेदवारीची संधी मिळाली तर सर्व जाती-धर्मातील लोकं एकत्र येऊन काम करतील अशा चर्चा मतदारसंघात सुरू आहेत.

पत्रकारांच्या पाठीशी कायम उभे असणार्‍या प्रा.रमेश आढाव यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून तालुक्यातील पत्रकार बांधवसुद्धा आपल्या लेखणीतून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार आहे. पत्रकार हा घटक कायम जनतेत राहून काम करत असतो. कसलाही स्वार्थ न बाळगता न्याय देण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करीत असतो, त्यामुळे पत्रकारांच्यासोबत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनता भक्कमपणे उभी राहणार असल्याची चर्चा आहे.

प्रा.रमेश आढाव यांचा फलटण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, तरुण, सुशिक्षित बेरोजगार यांना न्याय देण्याचे काम करणार्‍या आढाव सरांना आगामी विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली तर विधिमंडळातदेखील लोकहिताचे काम करतील असा विश्वास मतदार बोलून दाखवत आहेत.

स्थानिक प्रश्नांची माहिती असणारे व लोकहिताचे काम करणारे प्रा.रमेश आढाव यांच्यासारखे नेतृत्व फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विधिमंडळात गेले तर नक्कीच फलटण तालुक्याला एक अभ्यासू व न्याय देणारे आमदार म्हणून त्यांना ओळखले जाईल, त्यामुळे तालुक्यातील जनता अशा वैचारिक लोकनेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!