(जावली/ अजिंक्य आढाव) – वाखरी तालुका फलटणची सुकन्या व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कुमारी अक्षदा आबासाहेब ढेकळे पाटील हिला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
कु.अक्षदा ढेकळे पुणे क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू असून तिने यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व व नेतृत्व केले असून महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना महाराष्ट्राला अनेक पदके मिळवून दिली आहेत.
त्याचबरोबर तीची भारतीय हॉकी संघात निवड झाल्यानंतर भारतीय हॉकी संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना देशाला देखील अनेक पदके प्राप्त करून दिली आहेत.
कुमारी अक्षदा ढेकळे हिच्या या सन्मानाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.