(फलटण/ प्रतिनिधी ): – अतिशय जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकरी कुटुंबातील सासकल गावचे रहिवासी प्रतिक बाळासाहेब मुळीक यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली आहे.
प्रतिक यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल येथून झाले आहे. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी येथून पूर्ण केले आहे. इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी विज्ञान शाखेतून मुधोजी महाविद्यालय फलटण येथून पूर्ण केले आहे. सध्या ते मधोजी महाविद्यालयांमध्ये कला शाखेत पदवीच्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिक्षण घेत आहेत.
प्रतिज्ञा सैन्य दलातील पहिली भरती २०२२ला दिली. तेव्हा भरतीत मैदानी चाचणीत ते अपयशी झाले. नंतर २०२३ ला दुसरी भरती निघाली. त्यात त्यांनी पहिली लेखी परीक्षा दिली व त्यात ते उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी मैदानी चाचणी दिली दिले पण अंतिम गुणवत्ता यादीत त्यांचे नाव आले नाही. प्रतीक यांनी पुन्हा हार न मानता परत एकदा २०२४ मधे लेखी परीक्षा दिली त्यात ते उत्तीर्ण झाले.परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणीची तयारी मुधोजी कॉलेज फलटण येथे चालू केली. त्यांची मैदानी चाचणी गोवा या ठिकाण झाली.तिथे मैदानी चाचणीत ते उत्तीर्ण झाले झाले. प्रतिक यांचे आई वडील दोघे पण शेती करतात.त्यांनी प्रतिक ला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही.
वयाच्या २० व्या वर्षी शेतकऱ्याचा मुलगा भारतीय सैन्य दलात भरती झाल्यामुळे प्रतिक मुळीक यांच्यावर गावातून सासकल गावचे सरपंच उषा राजेंद्र फुले, उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, सासकल जन आंदोलन समितीचे पदाधिकारी, शाळा सुधार संघटनेचे सर्व पदाधिकारी, तसेच पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य भारतीय सैन्यात भरती झाल्यामुळे प्रतिकचे आई- वडील,आजी, काका,काकी,भाऊ, बहिण संपूर्ण कुटुंब आनंदाने भारावून गेले आहेत.