(फलटण /प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार श्री सचिन जाधव सासकल कृषि सहाय्यक फलटण जिल्हा सातारा यांचा मा.सी पी राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मौजे सासकल गावचे कृषी सहाय्यक सचिन भीमा जाधव यांना सन्मान पत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंढे व मा प्रधान सचिव जयश्री भोज भा.प्र.से, मा आयुक्त कृषी रवींद्र बनवडे भा.प्र.से मा कैलास मोते फलोत्पादन संचालक महाराष्ट्र राज्य, तसेच संचालक, विनयकुमार आवटे विकास पाटील, सुनील बोरकर, आणि अंकुश माने सहसंचालक या मान्यवरांच्या उपस्थित मध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लब वरळी मुंबई गौरव करण्यात आला.
सातारा जिल्यातील पाहिले कृषि सेवा रत्न मिळवण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून कृषि विभागा कडून दिला जाणरा हा पुरस्कार आहे. या पुरस्कारा बद्दल उमेश पाटील विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर, जिल्हा आधीक्षक कृषि अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषि अधिकारी फलटण सुहास रणसिंग, तालुका कृषि अधिकारी फलटण, दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषि अधिकारी विडणी शहाजी शिंदे, कृषि पर्यवेक्षक अजित सोनवलकर तसेच कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी सहाय्यक संघटना तसेच सासकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले, उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे, सासकल जन आंदोलन समिती, समस्त ग्रामस्थ सासकल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.त्याचे वेगवेगळ्या स्तरामधून अभिनंदन केले जात आहे.