गोखळी (प्रतिनिधी) फलटण पूर्व भागातील खटकेवस्ती येथे महाराष्ट्राचे लाडके उप – मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस साहेब याच्या कल्पकतेतून आणि माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुकध्यक्ष बजरंग नाना गावडे यांच्या तर्फे लाभार्थी सन्मान यात्रा चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आधार कार्ड दुरुस्ती , गवंडी कामगार योजना फॉर्म भरणे (संसार उपयोगी भांड्या साठी पात्र)व वयश्री योजना फॉर्म भरणे , लाडकी बहिण योजना तक्रार निवारण, पोलिस भरती माहिती, मुलींना महिला ना मोफत मेहंदी आणि टॅटू काढणे , बॉल मारून ग्लास पाडणे, रींग टाकणे तसेच चाय पे चर्चा अशा कार्यक्रमाचे अयोजन कऱण्यात आले होतें यामध्ये आसू, पवारवाडी, गोखळी, खटकेवस्ती, बरड, घुलेवस्ती, साठेफटा येथील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बजरंग नाना गावडे, भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष धनंजय पवार, प्रोजेक्ट प्रमुख दिपक सोलंकी तालुका किसानमोर्चा सरचिटणीस रणजित शिंदे, बूथ वॉरियर्स सुखदेव खटके, फलटण तालुका भटक्या विमुक्त जाती जमाती चे अध्यक्ष पिंटू जगताप, खटकेवस्ती चे युवा नेतृत्व उद्योजक अमोल अरुण गावडे, संग्राम खटके, गोखळी गावचे मां.उप सरपंच डॉ अमित गावडे, बूथ अध्यक्ष अनिल धुमाळ, शक्ती प्रमूख अमोल गावडे , श्रेयस गावडे पैलवान चेतन गावडे हरिभाऊ जाधव सुनील गुजले निखिल नारायण खटके यांनी फित कापून कार्यक्रमाचे उद्धघाटन केलें या कार्यक्रमाच्या साठी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक, महीला आणि लहान मुले उपस्थित होतें.