(जावली/अजिंक्य आढाव)- रोहित यांना लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची प्रेरणा होती. त्यांनी कोलवडकर करियर अकॅडमी वडले येथून केवळ २७ दिवसांच्या अभ्यासाने भारतीय सैन्यात प्रवेश करण्यासाठी योग्य तयारी केली. कोलवडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या यशामुळे गावातील तरुणांमध्ये देशसेवेची आणि शारीरिक तंदुरुस्तीची प्रेरणा निर्माण झाली आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी-रोहित यांच्या वडिलांचे नाव अजीत आनंदराव भगत असून ते देखील सैन्यात सेवा करत होते. त्यांच्या दोन चुलते, अंकुश भगत आणि शितल कुमार भगत, हे देखील भारतीय सैन्यात होते. याशिवाय, रोहित यांचे मोठे चुलत भाऊ प्रतीक भगत हे भारतीय सैन्यात होते. आणि ते पैलवान देखील होते. रोहित यांनी आपल्या कुटुंबातील सैन्य परंपरेला पुढे चालवत इंडियन आर्मी भरतीत मोठे यश मिळवले आहे.
शिक्षण आणि कुस्तीतील प्राविण्य :
रोहित यांनी आपले प्राथमिक शिक्षण जावली गावातील मराठी शाळेत सातवीपर्यंत पूर्ण केले, तर आठवी ते दहावीपर्यंत माळशिरस तालुक्यातील कोथळे गावातील मुख्याध्यापक दत्तात्रय शंकर दडस आदर्श विद्यालय कोथळे हायस्कूलमध्ये शिकले. आणि ११वी आणि १२वी S.B.Z. कॉलेज बार्शी येथे शिकेले.रोहित यांना कुस्तीचे विशेष कौशल्य असून ते राज्यस्तरीय पैलवान आहेत. कुस्ती आणि शारीरिक तंदुरुस्तीमध्ये प्राविण्य मिळवून त्यांनी भारतीय सैन्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल सर्व राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच जावली ग्रामस्थांन कडून अभिनंदन करण्यात आले.