(जावली/ अजिंक्य आढाव)- फलटण पूर्व भागातील गेल्या अनेक दिवसांपासून रात्री शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यातील लहान वासरे, शेळ्या, पाळीव कुत्र्यांना फस्त करणाऱ्या बिबट्याला निंबळक, बागेवाडी, परिसरातील नागरिकांनी जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
या परिसरात वाड्या वस्त्या भरपूर प्रमाणात मनुष्यवस्ती आहे.शाळकरीमुले ही आहेत.बिबटयाच्या दहशतीमुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक शेतात काम करणाऱ्या महिला भयभीत झाल्या आहेत.
रात्री ,अपरात्री, सकाळी माॅर्निग वाॅकला जाणाऱ्या नागरिकां मधून घबराटीचे वातावरण झाले असुन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात येत आहे.