क्राईम न्युज
फलटण तालुक्यात गणपती बाप्पाला शांततेत निरोप देण्यासाठी फलटण ग्रामीण मधून 14 जण तडीपार, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांची कारवाई
(फलटण/ प्रतिनिधी ) – सर्वत्र गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण साजरा होत असल्याने सणाचे कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु न देता गणेश उत्सव शांततेत पार पाडावेत या दृष्टीने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वेळोवेळी गुन्हे करुन सामाजिक स्वास्थ बिघडवणारे, दंगा गोधळ करणारे १४ गुन्हेगार याना तडीपार करण्यात आले असुन पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी फलटण ग्रामीण हद्दीतील सराईत गुन्हेगारावर मा. प्रातअधिकारी फलटण याचेकडे प्रस्ताव देण्यात आला होता त्या अनुशंगाने त्यानी सदर १४ गुन्हेगारा विरुध्द प्रातअधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री राचिन ढोले यांचे आदेशाने तडीपार करण्यात आले आहे