हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

फलटण ग्रामीण भागामध्ये शेती पंम्पाची चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलीसांकडुन जेरबंद

(फलटण/प्रतिनिधी)- फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहिती नुसार शेतीपंम्पाचे ०६ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकुण ४,४०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत एकुण ०३ जण अटकेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नंबर ९०८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) मधील फिर्यादी रोहित राजेंद्र शिंदे. रा. सुरवडी ता. फलटण, जि. सातारा, यांनी त्यांची ५ एच.पी.पावरची पाण्याची मोटार चोरीस गेलेबाबत दिले तक्रारीवरुन अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.शेती पंम्पाच्या चोरीबाबत गांभीर्य लक्षात घेवून पोलीसांनी गोपनीय माहिती काढल्यावर गुन्हयांत ३ आरोपींचा सहभाग असल्याबाबत माहिती मिळाल्यावर १) ओमकार संतोष मदने, रा. १७ फाटा, निमीरे ता. फलटण, २) विजय सुखदेव जाधव, रा. सुरवडी, ता. फलटण जि. सातारा, ३) ऑमकार शरद लोंढे, रा.सुरवडी, ता. फलटण, जि. सातारा यांना ताब्यात घेतल्यावर त्यानी सुरुवातीला उडवाउडवी उत्तरे दिली त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केल्यावर त्यांनी सुरवडी व फडतरवाडी भागामध्ये शेती पंम्पाची चोरी केली असल्याबाबत कबुली दिली. त्यानंतर त्यांचेकडून ०६ शेतीपंम्प, गुन्हयांत वापरलेल्या २ मोटार सायकल व २ मोबाईल असा एकूण ४,४०,०००/-रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक आरोपींचे कडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगीरी मा. समीर शेख सोो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सोो, अपर पोलीस अधीक्षक, मा. राहूल धस सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक मा. सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विशाल वायकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जी. बी, बदने, सहा. पोलीस फौजदार हजारे, पोलीस हवालदार नितिन चतुरे, पो.हवा. महादेव पिसे, पोलीस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉस्टेबल हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!