हि बातमी ईतर भाषेत वाचा
माहिती व तंत्रज्ञान

जावलीतील भिसे कुटुंबातील महिलांनी साकारली चित्राकला रेखाटणाऱ्या गौरी

(जावली/अजिंक्य आढाव)- जावली ता. फलटण येथील भिसे कुटुंबातील महिलांनी चित्र रेखाटणाऱ्या गौराई बसवल्यामुळे समाजा महिला सक्षमीकरण अर्थात मुलगी शिकली प्रगती झाली.असा संदेश देणारा व आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी महिला पुढे येत आहेत असाच एक संदेश देणारा म्हणजे चित्रकला सादरीकरण करणाऱ्या गौराई बसवल्या आहेत.हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जातो.या बाबत सविस्तर माहिती जयश्री भिसे यांनी दिली.

गौरी आली गौरी आली ! कशाच्या पावलांनी आली? असे म्हणताना तुम्ही नक्की ऐकलं असेल. गौरी आगमानाच्या वेळी असे म्हटले जाते. अनेक ठिकाणी गौरीला महालक्ष्मी, ज्येष्ठा-कनिष्ठा असे म्हणतात. प्रांतानुसार गौरीचे विविध प्रकार आपल्याकडे पहायला मिळतात.

आपल्याकडे गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रांतात प्रचलीत आहेत. कुलाचार आणि परंपरेनुसार महालक्ष्मीचे आवाहन, पूजन केले जाते. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवून त्यांची पूजा करतात. काही घरांमध्ये धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्रे, लोखंडी सळ्या किंवा सिमेंटचे स्टँण्ड मिळतात त्यावर गौरीचे मुखवटे ठेवतात आणि त्याला साडी नेसवून विधीवत पूजा करतात. काही घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.

 

काही ठिकाणी तेरडा या वनस्पतीचे रोप म्हणजे गौरी मानली जाते आणि तिची पूजा केली जाते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात, ही मुळे म्हणजेच गौरीची पावले, असा समज आहे. काही प्रांतात गौरी म्हणजे शंकराची पत्नी पार्वती असे समजून पूजा केली जाते. जसे तेरडा वनस्पती म्हणजे गौरी मानली जाते त्याचप्रमाणे शंकराचे प्रतीक म्हणून शंकरोबा नावाच्या वनस्पतीची पूजा करतात.

ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसविण्याची प्रथा आहे. त्यामधील एक गौरी घरातच असते, तीच लक्ष्म होय तर एक गौरी बाहेरून आणली जाते. तीच ज्येष्ठागौरी होय. ही ज्येष्ठागौरी घरात येताना तिचाही उल्लेख “लक्ष्मी” या नावानेच केला जातो. जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावर ती थोडी थांबवून लक्ष्मीच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो. त्यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो. हीच संकल्पना महिला आपल्या भाषेत सांगताना, “गौर आली गौर” “कशाच्या पाऊलांनी आली?” “गाईवासरांच्या पावलाने आली’ असे म्हणतात. ही एकूण आठ पाऊले असून त्यात आपल्या गरजेनुसार गाईवासरे, धनधान्य, अलंकार, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य, व्यवसायातील प्रगती, परीक्षेतील यश अशा अनेक मनोकामनांचा उल्लेख केला जातो.

अशी ही गौरी विविध रूपांत आपल्या घरी येते. तिच्या आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किया पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या पाऊलांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात, या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. गौरीच्या व्रतादिवशी सासुरवाशिणींना माहेरी विशेष मान असतो. माहेरवाशिणीचे लाड पुरविले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!