माहिती व तंत्रज्ञान
जावलीतील भिसे कुटुंबातील महिलांनी साकारली चित्राकला रेखाटणाऱ्या गौरी
(जावली/अजिंक्य आढाव)- जावली ता. फलटण येथील भिसे कुटुंबातील महिलांनी चित्र रेखाटणाऱ्या गौराई बसवल्यामुळे समाजा महिला सक्षमीकरण अर्थात मुलगी शिकली प्रगती झाली.असा संदेश देणारा व आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी महिला पुढे येत आहेत असाच एक संदेश देणारा म्हणजे चित्रकला सादरीकरण करणाऱ्या गौराई बसवल्या आहेत.हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जातो.या बाबत सविस्तर माहिती जयश्री भिसे यांनी दिली.
गौरी आली गौरी आली ! कशाच्या पावलांनी आली? असे म्हणताना तुम्ही नक्की ऐकलं असेल. गौरी आगमानाच्या वेळी असे म्हटले जाते. अनेक ठिकाणी गौरीला महालक्ष्मी, ज्येष्ठा-कनिष्ठा असे म्हणतात. प्रांतानुसार गौरीचे विविध प्रकार आपल्याकडे पहायला मिळतात.
आपल्याकडे गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रांतात प्रचलीत आहेत. कुलाचार आणि परंपरेनुसार महालक्ष्मीचे आवाहन, पूजन केले जाते. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवून त्यांची पूजा करतात. काही घरांमध्ये धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्रे, लोखंडी सळ्या किंवा सिमेंटचे स्टँण्ड मिळतात त्यावर गौरीचे मुखवटे ठेवतात आणि त्याला साडी नेसवून विधीवत पूजा करतात. काही घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.