(फलटण /प्रतिनिधी): सासकल ता.फलटण येथील सुरज आनंदराव फुले यांची नागपूर आरोग्य विभागात “सांख्यिकी अन्वेषक” पदी नुकतीच निवड झाली असून त्यासोबत सेट परीक्षा ही ते उतीर्ण झाले आहेत.ते “सहाय्यक प्राध्यापक” म्हणून ही पात्र झाले आहेत.सुरज चे वडील हे गवंडी काम व आई मजुरी काम करत असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुरज फुले यांनी हे यश संपादन केले आहे, सुरज फुले यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल येथून झाले असून माध्यमिक शिक्षण शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथेच झाले आहे.इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतून शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण येथे झाले. तर सन २०१७-२०२० या कालावधीत विज्ञान (सांख्यिकी) शाखेतून पदवीचे शिक्षण मुधोजी महाविद्यालय फलटण तर सन २०२१-२०२२ मध्ये पदव्युत्तर शिक्षण विज्ञान (सांख्यिकी)/Msc-statistics) शाखेतून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पूर्ण केले आहे.
त्याच्या या यशाबद्दल विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फलटण – कोरेगाव विधान सभेचे आमदार दीपकराव चव्हाण,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सासकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले,उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य सासकल,सासकल जन आंदोलन समिती,शाळा सुधार संघटन, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक, ग्रामस्थ व कुटुंबीयांनी त्याचे आभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.