हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

चिमणराव कदम यांनी समाज घडविणारी व्यवस्था निर्माण केली – उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे “5 सप्टेंबर, शिक्षक गुणगौरव व सेवानिवृत्तांचा सत्कार सोहळा”

गोखळी (प्रतिनिधी) माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम साहेबांनी गिरवी सारख्या छोट्यसा गावात जय भवानी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ,आज संस्थेच्या फलटण तालुक्यात २३ माध्यमिक विद्यालये,५ ज्युनिअर कॉलेज,१ टेक्निकल, १ अध्यापक विद्यालय , १ इंजीनियरिंग कॉलेज शाखा विस्तार केला . या संस्थेतून शिकलेले विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक वकील न्यायाधीश अधिकारी, पदाधिकारी पदावर कार्यरत आहेत . तळागळा पर्यंतच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी चिमणराव कदम साहेबांनी निर्माण केलेली व्यवस्था समाजाला आधारलेली आहे. समाज घडविणारी व्यवस्था निर्माण करणारे अजरामर असतात .समाज घडवणारी व्यवस्था निर्माण करणारे चिमणराव कदम साहेब अजरामर आहेत असे प्रतिपादन सातारा जिल्हा उपशिक्षणाधिकारी  (प्राथमिक) रविंद्र खंदारे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सह्याद्री भैय्या कदम यांनी आज शिक्षण व्यवस्था ही कालानुरूप बदलून नवीन आव्हानांना समोरे जाण्यासाठी सक्षम झाली पाहिजे असे आवाहन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथ)शबनम मुजावर ,सौ.चाहत सह्याद्री कदम, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रामचंद्र लावंड, अनिल शिंदे, केंद्र प्रमुख पारशे साहेब, दारासिंग निकाळजे, भरते साहेब, मठपती साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री भैय्या कदम होते . प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, संस्थेचे संस्थापक चिमणराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील ३० प्राथमिक शिक्षकांना “आदर्श शिक्षक” पुरस्कार,जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या मार्च २०२४ इयत्ता दहावी परीक्षेत १००% निकाल लागलेल्या ९ विद्यालयातील सर्व शिक्षक,१२ सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व सेवकांचा सत्कार,४ शैक्षणिक उठाव करणाऱ्या उत्कृष्ट माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार, तसेच संस्थेच्या विविध माध्यमिक विद्यालयातून राज्यपातळीवर निवड झालेल्या ३ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, श्री सह्याद्री भैय्या कदम, प्राचार्य संजयकुमार सावंत यांनी मनोगते व्यक्त केले.प्रास्ताविक संतोष होळकर सर, सुत्रसंचालन सचिन फडतरे,सौ‌ प्रीतम शिंदे,सौ.भोसले मॅडम यांनी केले.आभार भिसे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!