(फलटण/ प्रतिनिधी)- इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट योग शिक्षिका वृषाली गांधी संचलित राजयोग फिटनेस स्टुडिओला १ वर्ष पूर्ण झाले बद्दल क्लासच्या वर्धापनाचे दिनानिमित्त महात्मा शिक्षण संस्था मूकबधिर विद्यालयाला भेट देऊन विद्यालयातील मूकबधिर मुलांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले तसेच सर्व मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले.
यावेळी महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. वैशाली चोरमले, सौ. निना कोठारी, राजेंद्र कोठारी, मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे, रोहित गांधी जिनेशा गांधी इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना योग शिक्षिका सौ. वृषाली गांधी म्हणाल्या की स्कूलमधील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप करण्यासाठी राजयोग फिटनेस स्टुडिओ वृषाली गांधी यांच्यातर्फे तसेच भूलरोगतज्ञ डॉ. सौदामिनी गांधी अंकुर हॉस्पिटल यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या सर्व कार्यामध्ये तसेच पाठीचा कणा बनवून कणखर उभारणारे महावीर कॉम्प्युटरचे प्रोप्रायटर श्रीमान रोहित नितीन गांधी व जिनेशा गांधी या दोघांचे विशेष आभार.