(जावली/ अजिंक्य आढाव) – फलटण पासून 22 कि.मी अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेल्या जावली व परिसरातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक काळात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना घडवणारे जाई एज्युकेशन सोसायटी संचलित रॉयल इंग्लिश स्कूल जावली येथील उपक्रमशील शिक्षक प्रा.समीर गावडे सर यांना सन २०२४/२५ जिल्हा स्तरीय आई सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
फलटण पूर्व भागात राजुरी,कुरवली,बरड आदंरूड,मिरढे, जावली या ठिकाणाहून शिक्षण घेण्यासाठी येथे विद्यार्थी येत असतात यातच अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय सैनिक स्कूल, एन. एम. एम. एस , तसेच क्रिडा क्षेत्रात विद्यार्थीना घडवण्याचं काम राॅयल इंग्लिश स्कूल जावली यांच्या माध्यमातून प्रा.समीर गावडे सर यांचे कामकाज सुरू असते.
राॅयल इंग्लिश स्कूल जावली येथे स्वतंत्रपणे वसतिगृह सुरू करण्यात आले असून वाचन कक्ष , संगणकीय कक्ष अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करुन चांगले प्रकारे सुरू असते.अशा उपक्रमातून विद्यार्थी बहुमोल मार्गदर्शन करतात यासाठी जाई एज्युकेशन सोसायटी संचलित रॉयल इंग्लिश स्कूल जावली येथील उपक्रमशील शिक्षक प्राध्यापक समीर गावडे यांना सन २०२४/२५ “आई सन्मान पुरस्काराने” श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर, सचिव जयश्री तांबे, अध्यक्ष गणेश तांबे, प्रा.अमोल चवरे, वाघमोडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.