(जावली/ अजिंक्य आढाव)- स्व. माजी आमदार श्री. सूर्याची राव उर्फ चिमणराव शंकरराव कदम यांनी स्थापन केलेल्या जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी ( ता. फलटण.जि. सातारा) यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण उद्या गुरुवार , दि ५ सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता करण्यात येणार आहे.
जय भवानी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सह्याद्री सुर्याजीराव उर्फ चिमणराव कदम (भैय्या साहेब) यांच्या हस्ते फलटण येथील महाराज मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर फलटण येथे वितरण सोहळा होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा.श्री.शबनम मुजावर, शिक्षण अधिकारी ( प्राथ) जिल्हा परिषद सातारा, उपशिक्षणाधिकारी ( प्राथ) जिल्हा परिषद, सातारा , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती फलटण – श्री अनिल सपकाळ यांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जय भवानी एज्युकेशन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.