तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत पवारवाडी ,यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण , तरडगाव,धुळदेव संघ ठरले विजेता ; राॅयल इंग्लिश स्कूल जावली यांच्या वतीने आयोजन
(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण पूर्व भागात राॅयल इंग्लिश स्कूल जावली येथे तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये १४ ते १९वयोगटातील मुलं व मुलींच्या संघाचा त्यामधे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने हि स्पर्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडली.
तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत विजेते संघ खालीलप्रमाणे : – १४ वर्ष वयोगट मुली -ज्योतिर्लिंग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पवारवाडी,१४ वर्ष वयोगट मुले – श्रीमानसेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय धुळदेव १७ वर्ष वयोगट मुली – ज्योतिर्लिंग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पवारवाडी १७ वर्ष वयोगट मुले -सौ वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव१९ वर्ष वयोगट मुली -यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण,१९ वर्ष वयोगट मुले -यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण राॅयल इंग्लिश स्कूल जावली यांच्या वतीने आयोजन
या स्पर्धेसाठी 14 वयोगटातील 70 संघ समावेश तर , 17 वयोगटचे 80 संघ समावेश ,19 वयोगटात 16 संघ सहभागी झाले होते हि स्पर्धा सलग ३ दिवस चालू होती.
17 वयोगटातील मुलींमध्ये विजेता संघ पवार वाडी संघ,14 वयोगटातील मुलींमध्ये विजेता संघ – पवार वाडी संघ 19 वर्ष वयोगटात मुली विजेता संघ – यशवंतराव चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण तर मुलांमध्ये 14 वयोगट विजेता संघ- धुळ देव,17 वयोगट विजेते संघ – तरडगाव 19 वयोगटात विजेता संघ – यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण
या सामन्या मधे अतिशय चुरशीची लढत पाहिला मिळाली , फलटण तालुक्यात सर्वात मोठी स्पर्धा असल्याने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी यांनी भेट देऊन सामान्यांचा आनंद घेतला.
या सामान्यांसाठी जाई एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अमोल चवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय गावडे माता पालक समितीच्या अध्यक्षा रेहाना शेख, परिवहन समिती अध्यक्ष दत्तात्रय लंगुटे, शाळा व्यवस्थापन समिती मा.अध्यक्ष आप्पासाहेब ठोंबरे फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे काॅ.सुरज काकडे,श्री.ढोले, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारणकर फलटण तालुका क्रीडा अधिकारी सुमित पाटील क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष जनार्धन पवार आप्पासो वाघमोडे , उत्तम घोरपडे, कदम सर , पंकज पवार सर, हिंदुराव लोखंडे , दशरथ लोखंडे, काशिनाथ सोनवलकर व संदीप ढेंबरे , ताय्याप्पा शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते
हि स्पर्धा रॉयल इंग्लिश स्कूल जावली येथील क्रीडा शिक्षक वाघमोडे सर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या, शिस्तबद्ध पणे पार पडली.
या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आरोग्य विभाग जावली उपकेंद्र, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहकार्य लाभले,तसेच सर्व रॉयल इंग्लिश स्कूल शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचं विशेष सहकार्य लाभले ,रॉयल इंग्लिश स्कूल चे प्राचार्य समीर गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.