आपला जिल्हा
बौद्ध महामेळावा हजारोंच्या उपस्थितीत संपन्न सर्व-धर्म-समभावाचे दर्शन ; विविध जाती-धर्मांचा पाठिंबा
(फलटण/ प्रतिनिधी )फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाजाच्या उमेदवारीसाठी संविधान समर्थन समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेला बौध्द समाज बांधवांचा महामेळावा पावसाच्या हजेरीत, उत्साही वातावरणात, विविध समाजघटकांच्या पाठिंब्यासह हजारोंच्या उपस्थितीत फलटण शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात संपन्न झाला
विविध जाती-धर्मांचा पाठींबा
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी मराठा क्रांती मोर्चा, धनगर समाज, माळी समाज, मुस्लिम समाज, वडार समाज, संत रोहिदास चर्मकार समाज, कुंची कुर्वी समाज, मेहतर समाज, पारधी समाज यांच्यासह शेतकरी संघटना, बहुजन मुक्ती पार्टी (सातारा जिल्हा) यांनी महामेळावा दरम्यान जाहीर पाठिंबा दिला
महामेळाव्यापूर्वी तब्बल दीड महिना नियोजन समितीतील २५-३० पदाधिकाऱ्यांनी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मेळाव्याची माहिती देत बौद्ध उमेदवारीच्या मागणीची पार्श्वभूमी स्पष्ट केली होती. संपुर्ण विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाज बांधवांच्या निर्णय व पाठींब्यानंतर फलटणमध्ये महामेळावा यशस्वी पार पाडण्यात आला.
सर्व-धर्म-समभावाचे दर्शन
बौद्ध महामेळाव्याच्या निमित्ताने फलटण शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना विविध प्रकाराच्या रंगीत फुलांनी अकर्षक सजविण्यात आले होते. प्रमुख चौकात स्वागत कमान, विविध रंगांचे ध्वज उभारण्यात आले होते. व्यासपीठावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांच्या प्रतिमा स्क्रीनवर लावून सर्व-धर्म-समभावाचे दर्शन घडविण्यात आले होते.