(फलटण/प्रतिनिधी)गोविंद डेअरी पंढरपूर रोड येथून फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीतील दि.१९/०५/२०२४ मधील चोरीस गेलेले सीबी शाईन मोटर सायकल नं. MH 11 CL 0269, दिनांक २०/०५/२०२४ मधील चोरीस गेलेले सीबी युनिकॉर्न मोटर सायकल नं. MH 11 BU 5991 दिनांक 13/03/2022 मधील चोरीस गेलेले HF डिलक्स मोटर सायकल नं. MH 11 BJ 8067 या सर्व मोटर सायकल गोविंद दूध डेअरी, पंढरपूर रोड, फलटण शहर येथून चोरीस गेल्या होत्या.
सदर मोटर सायकल माळशिरस पोलिस ठाणे , दिनांक 04/04/2024 मधे तपासात जप्त केल्या होत्या. त्या तिन्ही मोटर सायकल फलटण शहर पोलिसांन कडे दिल्या आहेत या घटनेतील आरोपी (१) गणेश बाळासो जाधव, वय १९ वर्षे, रा. जाधववाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर आणि (१) अनिल उर्फ संदीप दिलीप लोंढे, वय २५ वर्षे, रा. मेडद, तालुका माळशिरस यांना अटक करण्यात आली होती.
सध्या सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार हेमा पवार या करीत आहेत.