(जावली/अजिंक्य आढाव) दुधेबावीत राजेगटाला आगामी काळात मोठी ताकद मिळवून देणार असल्याचे राजे गटाचे युवा नेते विकास सोनवलकर यांनी फलटण येथील परिश्रम न्युज चॅनेल शी बोलताना सांगितले.
जे लोक राजेगटाला सोडून गेलेत त्यांचा विचार न करता जे आमच्या सोबत प्रामाणिकपणे काम करणार आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही इथून पुढे काम करणार आहोत असेही विकास सोनवलकर यांनी स्पष्ट केले.तसेच पाठीमागील काळात जी काही विकास कामे अपूर्ण राहिली आहेत ती वेळ देऊन व पाठपुरावा करून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
तसेच लवकरच यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बैठक दुधेबावीत आयोजित करणार आहे.
तसेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजेगटाला जास्तीत जास्त मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.सध्या गावातील बहुतांशी लोकांनी आम्ही राजे गटासोबत आहोत असे सांगितले आहे.परंतु आगामी काळात कोण कोठे थांबणार आहे याची चौकशी करून योग्य दिशा ठरवणार असल्याचेही सोनवलकर यांनी सांगितले आहे.