गोखळी(प्रतिनिधी) जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आय.बी.पी.एस.संस्थेमार्फत सरळसेवा भरती 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत “आरोग्य पर्यवेक्षकपदी”फलटण तालुक्यातील पुर्व भागातील खटकेवस्ती – गवळीनगर येथील चि.शंतनू हनुमंत जाधव यांची निवड झाली.
असून चि.शंतनू जाधव यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद गवळीनगर शाळेमध्ये पहिली ते चौथी, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल मेखळी.उच्चशिक्षण मुधोजी महाविद्यालय फलटण येथे झाले असून फलटण एस.टी.आगारातील वाहतूक नियंत्रक हनुमंत जाधव.यांचे चिरंजीव आहेत.त्याच्या निवडीबद्दल खटकेवस्ती-गवळीनगर. गोखळी पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.