(फलटण/ प्रतिनिधी)- फलटण शहरांमध्ये अनेक तरुण दोन चाकी, चार चाकी गाड्या सुसाटपणे व वेगाने वाहने चालवताना आढळून येत आहेत. यामुळे मध्यंतरी एका शिक्षकाचा व वृद्धाचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर एक जण गंभीर रित्या जखमी झाला असे प्रकार वारंवार घडत असून त्यांच्यावर कायद्याचा कसलाच वचक राहिलेला दिसून येत नाही तरी अशा भरधाव वेगाने व विना परवाना गाड्या चालवणाऱ्यांवर कायदेशीर रित्या योग्य कारवाई झाली पाहिजे अशी मागणी फलटण शहरातील नागरिकांच्या मधून होत असतानाच फलटण शहर पोलीस स्टेशन व डीवायएसपी ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी ०९.०० वाजता ते ११.३० वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण शहर येथे फलटण शहर पोलीस ठाणे आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांचे कडील निर्भया पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत मोटर वाहन कायद्यांतर्गत २८ केसेस मधे रू.१९४००/- दंड आकारण्यात आला आहे. व आणि १९ विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि १३ व्यक्तीवर कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कारवाई केली आहे.
या कारवाईत फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पो.शि.पांडुरंग धायगुडे, ऋषिकेश खरात, मारुती लोलापोड, संभाजी जगताप सुरज परिहार आणि निर्भया पथकतील महिला पोलीस हवालदार वैभवी भोसले, पोलीस नाईक फैयाज शेख, पो.शि. दत्तात्रय भिसे, संध्या वलेकर यांनी सहभाग घेतला.
फलटण शहर पोलीस स्टेशन व डीवायएसपी ऑफिस यांच्याकडून करण्यात आलेल्या ठोस कारवाईबद्दल सर्व स्तरातून त्यांना धन्यवाद दिले जात आहे.