हि बातमी ईतर भाषेत वाचा
राजकीय

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दि. २५ रोजी फलटण येथे बौद्ध समाजाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन

(फलटण/ प्रतिनिधी) –  २५५ फलटण – कोरेगांव हा २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या राखीव विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौध्द समाजातील घटकाला गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याची समाजात खंत निर्माण झाल्याने व आपणास डावलले जात असल्याची भावना निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूकीत बौध्द समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी अवघ्या फलटण -कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील बौध्दांनी ” एकच निर्धार …बौद्ध आमदार ‘ अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले आहे. या संवाद अभियानास फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बौद्ध समाजातील बांधवांची राजकीय मोठ बांधण्यासाठी फलटण येथे बौद्ध समाजाच्या महामेळाचे आयोजन रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण याठिकाणी करण्यात आले आहे.

शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा भीम गीतांचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. त्याचबरोबर नवोदित गायक, संगीतकार व गीतकार सागर भोसले हे आपले गाणे यावेळी सादर करणार आहेत.

फलटण – कोरेगाव मतदार संघातील ग्रामीण भागातील गांवा गांवात संवाद अभियानापुर्वी शहर व तालुक्यातील सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, कृषी, सहकार, पत्रकारिता क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली या बैठकीत एकच निर्धार … बौध्द आमदार ” या संकल्पनेचा नारा देण्यात आला यातुन शहर व ग्रामीण भागात लोकसंवाद, गांव भेट कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता.

फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील बौध्द समाज बांधवांचा महामेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या महामेळाव्यात फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बौद्ध बांधव मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे अनेक राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

दि. १३ जुलै पासुन आजअखेर रोज सांयकाळी २५ – ३० प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ७-८गाडयांचा ताफा गांवा गांवात जात आहे , बैठका होत आहेत स्थानिक नागरिक या बैठकांना उपस्थित राहवुन उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत, प्रमुख पदाधिकारी बैठकांना संबोधीत करीत आहेत या वेळी आपल्या समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह करतानाचे चित्र गांवा गांवात दिसत आहे.

बौद्ध समाजाच्या विविध बैठकांनंतर तालुक्यातील विविध जातीधर्म, राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संपर्क करीत, उमेदवारी मिळवुन देण्यासाठी सहकार्य व पाठींबा व्यक्त करण्याचे आभियान सुरू केले असुन या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.

विडणी, पिंपरद, आसू, गुणवरे, बरड, आंदरूड, तरडगांव, साखरवाडी,आदर्की, वाठार – निंबाळकर,राजाळे, उत्तर कोरेगाव यासह 80 हून अधिक गांवात संवाद अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. जो राजकीय पक्ष बौध्द समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या पाठीमागे उभे ठामपणे राहण्याचा निर्धार ग्रामीण भागातील तरुण व ज्येष्ठ ग्रामस्थांनी बोलुन दाखविला आहे. आजपर्यंत बौद्ध समाजाने विविध राजकीय नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये मतांच्या रूपाने मदत केली त्याचे उत्तरदायित्व म्हणुन त्यांनी आता आमच्या बौद्ध समाजाला विधानसभा उमेदवारी मिळवुन दयावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दि. 25 ऑगस्ट रोजी फलटण येथे बौद्ध समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे.

संवाद दौऱ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, वरिष्ठ युवा पत्रकार सचिन मोरे, शक्ती भोसले, सचिन अहिवळे, मधुकर काकडे, विजय येवले, संजय निकाळजे, राजु मारूडा सुधीर अहिवळे, संजय गायकवाड, नंदकुमार मोरे, बी .टी .जगताप, विकास काकडे , दत्ता अहिवळे, संग्राम अहिवळे, दया पडकर, सनी काकडे, हरीष काकडे, संदिप काकडे, उमेश कांबळे, शितल अहिवळे, शाम अहिवळे, विकी काकडे, बंटी साबळे,सुरज अहिवळे,महादेव गायकवाड, अमित भोसले, रोहित माने , सागर अहिवळे आदी मान्यवर सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!