हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या घटनेचा गोखळीत निषेध

गोखळी( प्रतिनिधी ):कोलकत्ता येथील आरजीकार मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टर वर बलात्कार करून हत्या करण्यात आली या संतापजनक घटनेचा गोखळी आणि पंचक्रोशीतील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन आज शनिवारी वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवून कोलकत्ता घटनेचा निषेध व्यक्त करून या घटनेमध्ये बळी पडलेल्या महिला डॉक्टर  यांना श्रद्धांजली अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.

यावेळी डॉ शिवाजी गावडे, डॉ विकास खटके यांनी या देशात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या नाही तीने आत्महत्या केल्याचे भासविण्याचा प्रयत्न स्थानिक वैद्यकीय काॅलेजकडून.हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरच्या घरातील नातेवाईकांनी चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर हा अत्यंत क्रुर घटना उघडकीस आली या महिला डॉक्टरच्या मालिका यांना कठोर शासन झाले पाहिजे असे डॉ . विकास खटके यांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या  संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली ठिकठिकाणी कैडल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला.या घटनेचा निषेध व्यक्त करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या गुंडगिरी नंतर इंडियन मेडिकल असोसिएशन सह सर्वच वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांच्या सेवा २४ तास बंद राहतील असे जाहीर केले ‌फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील.या अनुषंगाने गोखळी आणि पंचक्रोशीतील सर्व येथील डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवून कोलकत्ता घटनेचा निषेध केला.यावेळी डॉ.शिवाजीराव गावडे,डॉ अमोल आटोळे, डॉ इंद्रजित भोसले, डॉ नितीन गावडे, डॉ. संतोष जाधव, डॉ.सुखदेव नाझीरकर, डॉ हणमंत गावडे, डॉ.विकास खटके,फार्मासिस्ट नंदकुमार गावडे, विराज गावडे,लॅब टेक्निशियन सोमनाथ वायसे, एक्सरे टेक्निशियन पवार, वैद्यकीय काॅलेजचे विद्यार्थी पृथ्वीराज गावडे, मयूर जगताप, रमेश दादा गावडे,(सवई) डॉ मांढरे,काळेश्वर ढोबळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सोमनाथ गावडे, राजेंद्र भागवत, दत्तात्रय ढोबळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!